धक्कादायक - मुंबईतल्या माॅलमधील रुग्णालयाच्या आगीत ९ जणांचा मृत्यू

भांडूप स्टेशनजवळील ड्रीम्स माॅलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयात मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत ९ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माॅलमध्ये रुग्णालय सुरु असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत चौकशीची घोषणा केली आहे.
Mumbai Hospital Fire
Mumbai Hospital Fire

मुंबई : भांडूप स्टेशनजवळील ड्रीम्स माॅलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयात मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत ९ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माॅलमध्ये रुग्णालय सुरु असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत चौकशीची घोषणा केली आहे. (Nine Dead Fire in Mumbai Hospital at Bhandup)

भांडुप  (Mumbai) येथील ड्रीम मॉल मध्ये रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही आग (Fire)लागली. या रुग्णालयात त्यावेळी ७६ रुग्ण दाखल होते. भीषण आग लागली आहे.या मॉल मध्ये सनराईस हे कोव्हिडं रुग्णालय आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २४ पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ८ तासानंतर देखील आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. 

पहाटेच्या सुमारास या रुग्णालयाला आग लागली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळीही आग विझविण्याचे काम सुरु होते. दरम्यान, माॅलमध्ये कोविड रुग्णालय असल्याचे आपण पहिल्यांदाच पाहिले असून याबाबत कारवाई केली जाईल, असे महापौर पेडणेकर यांनी सांगितले. पोलिस उपायुक्त प्रशांत कदमही घटनास्थळी असून ते मदतकार्यावर देखरेख करत आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com