बाळासाहेबांमुळे तुमचे वडील मोठे झाले..उपकार विसरु नका..खैरेंनी राणे बंधूंना फटकारले..

आम्ही निलेश राणेंना दम भरला होता. निलेश राणे, नितेश राणे हे काहीही करु शकत नाही,
Sarkarnaa Banner (43).jpg
Sarkarnaa Banner (43).jpg

मुंबई : तीन दिवसांपूर्वी दादरच्या शिवसेनाभवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा  झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधील शाब्दिक चकमकी अजूनही सुरु आहेत. या वादावरुन भाजप नेते निलेश राणे व नितेश राणे यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. त्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी आज ते माध्यमांशी बोलत होते. nilesh rane nitesh rane cant do anything say shivsena leader chandrakant khaire

चंद्रकांत खैरे म्हणाले की, ऐन निवडणुकीच्या वेळी भाजप नेते नारायण राणे शिवसेनेला सोडून काँग्रेसमध्ये गेले. तेव्हा निलेश राणे हे सरकारी गाडी घेऊन फिरत होते.  त्यावेळी आम्ही निलेश राणेंना दम भरला होता. निलेश राणे, नितेश राणे हे काहीही करु शकत नाही, आपण कोणामुळे मोठे झालो आहोत, हे ते विसरले आहेत. शिवसेना प्रमुख यांच्यामुळे नारायण राणे मोठे झाले. त्यामुळे तुम्ही काहीही बोलू नका आणि उपकार विसरु नका. 

श्रीराम मंदिरासाठी विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे  मुखपत्र ‘सामना’मध्ये  भाष्य करण्यात आले होते. यावरुन शिवसेना आणि भाजप कार्यक्रर्त्यांमध्ये राडा झाला. या वादामुळे भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे टाकले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे.  

बुधवारी भाजपच्या मुंबई युवा मोर्चाचे कार्यकर्ते दादर येथील शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी पोहोचले. या आंदोलनाची कुणकुण लागताच शिवसेनेचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने बाचाबाचीला सुरुवात होऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.  

या प्रकरणावर निलेश राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली होती. आपल्या टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात की, दादर मध्ये सेना भवन आहे...दादर कोणाच्या बापाचं नाही. तो दिवस लांब नाही ज्या दिवशी सेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील. 

या राड्यावर नितेश राणे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, जाऊन सांगा आज सेना भवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे.. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ??
 Edited by : Mangesh Mahale


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com