शिवसेनेची हालत वर्धापन दिनाच्या या बॅनरसारखीच!   - Nilesh Rane criticizes ShivSena | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

शिवसेनेची हालत वर्धापन दिनाच्या या बॅनरसारखीच!  

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 20 जून 2021

सिंधुदुर्गमध्ये एका पेट्रोलपंपावर शिवसेना आणि राणेसमर्थक भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेनेला (ShivSena) लक्ष्य करणारे भाजप नेते माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनरवरून शिवसेनेवर टीका केली. तसेच, शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. शनिवारीच सिंधुदुर्गमध्ये एका पेट्रोल पंपावर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. (Nilesh Rane criticizes ShivSena) 

हे ही वाचा : सारथी संस्थेला स्वायत्तता; मराठा समाजासाठी विविध सवलती

या संदर्भात निलेश राणे यांनी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, ''शिवसेनेचा वर्धापन दिनाचा बॅनर पण शिवसेना आमदार नाईक सारखा लुक्का निघाला... एका तासात उलटा झाला. शिवसेना पक्षाची हालत पण या बॅनर सारखीच झाली आहे. वाईट वाटते स्व. बाळासाहेब ठाकरेंसाठी, पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन... संपणार कुत्र्यांमुळे. असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. त्यांनी शिवसेनेच्या एका बॅनरचा फोटो ट्वीट केला आहे. 

हे ही वाचा : अजितदादांना पिंपरी-चिंचवडमध्ये चितपट करु: आमदार जगतापांचे खुले आव्हान

दरम्यान, सिंधुदुर्गमध्ये एका पेट्रोलपंपावर शिवसेना आणि राणेसमर्थक भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी एका पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल वाटायला सुरुवात केली. भाजपला पेट्रोल दरवाढीवरून खिजवण्यासाठी हा प्रकार केल्याचे बोलले जात होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी आमदार वैभव नाईक देखील त्यामध्ये पडले होते, पण तेवढ्यात पोलिसांनी हा प्रकार थांबवला.  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख