एका अभिनेत्रीने मुंबईच्या रस्त्यावर शिवसेनेची औकात काढली : नीलेश राणे 

शिवसैनिकांमध्ये जुनी धमक शिल्लक आहे की नाही?
Nilesh Rane criticizes Shiv Sena over Kangana case
Nilesh Rane criticizes Shiv Sena over Kangana case

पुणे : अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेनेला धमकी देत मुंबईत जोरदार एन्ट्री मारली. तिने मुंबईतल्या रस्त्यावर शिवसेनेची औकात काढली आणि हे तिच्या निर्जीव फोटोला जोडे मारत बसले आहेत, अशी टीका करीत शिवसैनिकांमध्ये जुनी धमक शिल्लक आहे की नाही? असा प्रश्‍न माजी खासदार नीलेश राणे यांनी विचारला आहे. 

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात गेल्या आठवढ्यात ट्‌विटर वॉर सुरू होते. राऊत यांना जोरदार उत्तर देऊन मुंबईत येते, आडवून दाखवा असे खुले आव्हान देत कंगना दोन दिवसांपूर्वी मुंबईत दाखल झाली आहे. मुंबईत आल्यानंतरही तिने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. 

मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईने देशभर शिवसेना व राज्य सरकावर टीका झाली आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन दिवसांत शिवसेनेला कंगनासमोर काहीसे नमते घ्यावे लागले आहे. या साऱ्या घडामोडींचा संदर्भ देत माजी खासदार राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. 

माजी खासदार राणे हे खासदार संजय राऊत व शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कंगनाच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच शिवसेनेला एखाद्या विषयावरून माघार घ्यावी लागली आहे. खासदार राऊत यांनी कंगनावर केलेल्या टीकेची भाषा आणि कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई यामुळे शिवसेनेविषयी एक प्रकारची नाराजी पसरली आहे. 

या परिस्थितीची जाणीव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अप्रत्यक्षपणे करून दिल्यानंतर शिवसेनेची कंगनाच्या विषयातील धार कमी झाली आहे. कंगना या विषयावर कोणत्याही प्रवक्‍त्याने बोलू नये, अशी सूचना शिवसेनेच्या वरिष्ठांना द्यावी लागली. 

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेवर टीका करण्याची संधी राणे यांनी साधली आहे. शिवसेनेवर एवढी वाईट अवस्था आली की त्यांना विमानतळावर हाऊस किपिंगच्या स्टाफला घेऊन आंदोलन करावे लागले. हे कर्मचारी बाजूला केले, तर किती शिवसैनिक त्या ठिकाणी होते, ही विचार करण्यासारखी बाब असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com