NIAला संशय...मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी माने देखील घटनास्थळी उपस्थित.. - NIA Sunil Mane was also present at the time of Mansukh murder | Politics Marathi News - Sarkarnama

NIAला संशय...मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी माने देखील घटनास्थळी उपस्थित..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 एप्रिल 2021

मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी सुनील माने देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचा संशय आता एनआयएला NIA आहे.

मुंबई : मनसुख हिरेन हत्या  प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलिस निरीक्षक सुनील मानेच्या चौकशीत मनसुखच्या हत्येवेळी माने देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचा संशय आता एनआयएला NIA आहे. कारण ता. ४  मार्चला कुणालाही न सांगता मोबाईल गुन्हे शाखा कार्यालयात ठेवूनच माने बाहेर गेले होता.

 
ज्या पद्धती निंलबित पोलिस अधिकारी सचिन वाझेने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मोबाइल कार्यालयात ठेवून लोकलने प्रवास करून ठाणे गाठले. त्याच पद्धतीने मानेनंही तपासा दरम्यान ते कार्यालयातच असल्याचे एनआयएच्या NIA अधिकाऱ्यांना सांगितलं होते. माञ मोबाइल कार्यालयात ठेवून कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर कार्यालयापासून काही अंतरावर उभ्या एका गाडीत बसून गेल्याचं सांगितलं जात आहे.  

याबाबत मानेचे दोन आँडर्ली आणि दोन चालकांची NIAनं चौकशी केली आहे. या चौघांच्या चौकशीतून NIAला माने त्या दिवशी नेमकं कुठे होता. हे जाणून घ्यायचं असावं, खरतर सरकारी नियमानुसार जर सरकारी कर्मचाऱ्याला त्याला देण्यात आलेली सरकारी गाडी प्रवासासाठी वापरायची झाल्यास, त्याची गाडीची आणि कुठल्या कामासाठी कुठे जाणार याची नोंद लाँकबुकमध्ये करावी लागते. त्यानुसार NIAनं ते लाँकबुक स्वत:च्या ताब्यात चौकशीसाठी घेतलं आहे.

माने ज्या गाडीतून गेला ती गाडी काही मिनिटांनी कळवा येथे गेली. त्याच ठिकाणाी मानेच्या गाडीत वाझे पाहिले रुमालं घेऊन, मानेनं मनसुखला तावडेच्या नावाने फोन करीत बोलावून घेतले. कालांतराने त्यांनी मनसुखला दुसऱ्या गाडीत बसवले. त्याच गाडीतील आरोपींनी मनसुखची हत्या केली असण्याचा संशय NIAला आहे. NIA चा तपास अजून सुरू असून पुढचा पुरावा मिळेपर्यंत प्रकरणात आणखी काय सत्य समोर येतं ते पाहणं महत्वाचं राहणार आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी नवीन खुलासे येत आहे. मनसुख यांची हत्या करण्यात आली त्यावेळी त्याच्या तोडांत ५ ते ६ रुमाल कोंबलेले होते. हे रुमाल दुसरं तिसरं कुणी नसून निंलबित पोलिस निरिक्षक सचिन वाझेनेच कोबंल्याचं सांगितलं जात आहे. कारण मनसुख हिरेन हत्येच्या दिवशी वाझे हे सीसीटिव्हींची नजर चुकवत लोकलने  ठाणेला आला होता. त्यावेळी कळवा स्थानकावर त्याने हे रुमाल खरेदी केल्याचं सांगितलं जातं आहे.

NIAच्या तपासात कळवा स्थानक परिसरातले CCTV तपासले असता. वाझेप्रमाणे एक व्यक्ती रुमाल खरेदी करत असल्याचे CCTV मध्ये कैद झालं आहे. CCTV अस्पष्ठ असला तरी देहबोली आणि कपड्याचा रंग ही वाझेच्या कपड्यासारखाच आहे. त्या अनुषंगाने इतर आरोपींकडे चौकशी केली होती.
 
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIAनं अटक केलेला पाचवा आरोपी सुनिल माने याच्या घरी NIA नं काल छापेमारी केली.या। वेळी NIAनं त्याच्या घरातून आणि कार्यालयातून काही महत्वाचे कागदपञ आणि मानेची लाल रंगाची क्रेटा कार हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे माने हे देखील त्याच्या कारचा नंबर बनावट वापरत असल्याचं तपासात समोर आलं होतं.
  Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख