प्रदीप शर्मा यांच्या संपर्कातील अनेकांची `एनआयए` कडून चौकशी  - NIA investigating persons in contact with Pradeep Sharma | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

प्रदीप शर्मा यांच्या संपर्कातील अनेकांची `एनआयए` कडून चौकशी 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

वादग्रस्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या संपर्कातील अनेकांची गेल्या दोन दिवसांत राष्ट्रीय तपास यंत्रणा `एनआयए`च्या तपास अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. यातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

मुंबई : वादग्रस्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा (NIA investigate persons who are in contact of Controversial Cop Pradeep Sharma) यांच्या संपर्कातील अनेकांची गेल्या दोन दिवसांत राष्ट्रीय तपास यंत्रणा `एनआयए`च्या तपास अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. यातून महत्त्वाचे धागेदोरे (Agency may get Major links) हाती लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

पोलिस अधिकारी शर्मा यांच्या संपर्कातील सायन येथील रहिवासी राजू राव याला `एनआयए`ने चौकशीसाठी  ऑफिसला बोलवले आहे. राजू राव याचा पालेभाज्या वाहतुकीचा व्यवसाय आहे. तो शर्मांनाही नियमित भाजीपाला तसेच अन्य वस्तू पुरवत होता. राजू राव काल दुपारी एकच्या दरम्यान `एनआयए` कार्यालयात पोहोचले. त्याची अद्याप चौकशी सुरू आहे.

...

हेही वाचा...

हवामान बदलावे तसे नाना पटोले बदलतात

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख