वाझे संदर्भातील अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळले... - NIA court rejects vaze's application   | Politics Marathi News - Sarkarnama

वाझे संदर्भातील अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळले...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 मार्च 2021

वाझेंच्या चौकशीवेळी वकिलांना सोबत राहण्याची मात्र मुभा

मुंबई: सचिन वाझे  यांच्या संदर्भातील तीन अर्ज एनआयए कोर्टाने मंगळवारी फेटाळले. कार्यालयात सीसीटीव्ही नसून सरकारी अधिकाऱ्याला अशाप्रकारे अटक करता येत नसल्याचे एनआयएने म्हटले आहे. अटकेची प्रक्रिया देखील बेकायदेशीर असून हे दावे एनआयए कोर्टाने फेटाळले. केवळ वकिलांना भेटू देण्याची मागणी कोर्टाने मान्य केली असून वाझेंच्या चौकशीच्यावेळी वकिलांना सोबत राहण्याची मुभा दिली गेली. 

17 फेब्रुवारीला मनसुख हिरेन विक्रोळी परिसरातून ओला कॅबने सीएसएमटी परिसरात आले होते. सीएसएमटीमधल्या शिवाला हॉटेल परिसरात याच मर्सिडीज कारमध्ये मनसुख हिरेन बसले होते आणि त्यांनी कोणाशी तरी 10 मिनिटे चर्चा केली, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली. या प्रकरणी एक सीसीटीव्ही एनआयएने ताब्यात घेतला होता. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावरुन भाजपने अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली होती. सचिन वाझेने दहशतवादाचा कट रचला आणि ते गृहमंत्र्यांना माहितीच नाही, असा आरोप करत भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. 

वाझे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित अनेक व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाझे यांचे निलंबन रद्द करून त्यांना सेवेत घेणारे, त्यांच्याकडे महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी देणारे म्हणून मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांचे नाव घेतले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख