शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर, मुख्य प्रवक्तेपदी 'या' दोन खासदारांची नियुक्ती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
 New list of Shiv Sena spokespersons announced .jpg
New list of Shiv Sena spokespersons announced .jpg

मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने ही यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासह खासदार अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी पदोन्नती झाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनेते सचिन अहिर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, आनंद दुबे यासारख्या नव्या नेत्यांची प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे. याशिवाय परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, आमदार सुनील प्रभू, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या प्रवक्त्यांना पुनर्नियुक्त देण्यात आली आहे. तर आमदार भास्कर जाधव यांनाही प्रवक्तेपद देण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक लक्षात घेत विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांचीही प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे.

यामध्ये हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना नव्या यादीत स्थान मिळालेले नाही.

शिवसेना प्रवक्तेपदी कोण?

संजय राऊत – राज्यसभा खासदार, मुख्य प्रवक्ते
अरविंद सावंत – खासदार (मुंबई), मुख्य प्रवक्ते
प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
सचिन अहिर – शिवसेना उपनेते 
सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) 
अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) 
मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार 
किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)
शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) 
डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) 
किशोर कान्हेरे (नागपूर) 
संजना घाडी 
आनंद दुबे (मुंबई)  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com