ग्लोबल हॉस्पिटलमधील खाटांसाठी राष्ट्रवादी करणार आंदोलन 

परळमधील बड्या ग्लोबल रुग्णालयातील महापालिकेच्या वाट्याच्या पंधरा टक्के खाटा गरिबांना मिळण्याबाबत महापालिकेने अंमलबजावणी केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस तथा नगरसेवक बबन कनावजे यांनी दिला आहे.
NCP will agitate for beds in Global Hospital
NCP will agitate for beds in Global Hospital

मुंबई : परळमधील बड्या ग्लोबल रुग्णालयातील महापालिकेच्या वाट्याच्या पंधरा टक्के खाटा गरिबांना मिळण्याबाबत महापालिकेने अंमलबजावणी केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस तथा नगरसेवक बबन कनावजे यांनी दिला आहे. 

परळमधील हे रुग्णालय महापालिकेच्या जागेवर बांधण्यात आले आहे, या संदर्भातील करारातच रुग्णालयातील पंधरा टक्के खाटा महापालिकेच्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. मुंबई महापालिकेचे कार्यकारी अधिकारी सांगतील त्या रुग्णांवर महापालिका रुग्णालयांच्या दरात उपचार करावेत, असे त्यात म्हटले होते. मात्र, या अटीची केव्हाही अंमलबजावणी झाली नाही, असा दावा नगरसेवक कनावजे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी आज (ता. 14 जुलै) समाज माध्यमांवरून संवाद साधताना आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

रुग्णालय बांधताना तेथे मैदान तयार करून देण्याचीही अट होती, मात्र तीदेखील पाळण्यात आली नाही. या दोनही अटींचा नागरिकांना कोणताही फायदा झाला नाही. परिसरातील लोकप्रतिनिधींनीदेखील यासाठी कधीही आग्रह धरला नाही. या अटी कळल्यावर आपण सर्व प्रकरण तपासून धसास लावण्याचा निर्णय घेतला. संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. त्यावेळी या संदर्भात सामंजस्य करार करून या खाटा आपल्या ताब्यात घेण्यात येतील व गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वी दिले होते. तरीही यासंदर्भात पुढे काहीही हालचाली झाल्या नाहीत, असे कनावजे यांचे म्हणणे आहे. 

रुग्णालयाचा फायदा व्हावा म्हणून महापालिकेच्या एफ दक्षिण विभागाचे अधिकारी संगनमत करून येथील महापालिकेच्या वाट्याच्या खाटा ताब्यात घेत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात आपल्याला सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते संपर्क साधत असून त्यांनीही या लढ्यासाठी पाठिंबा देऊ केला आहे. त्यामुळे लवकरच आम्ही एकजुटीने आंदोलन करू, या संदर्भात काही दिवसांतच निर्णय घेतला जाईल. 

गरिब रुग्णांना गेली दहा वर्षे खाटा न मिळाल्याने त्यांचा झालेला तोटा रुग्णालयाने भरून द्यावा, अशी मागणीही कनावजे यांनी केली. मुंबई महापालिकेने दोन ते तीन दिवसांतच याबाबत निर्णय घ्यावा; अन्यथा नंतर काय होईल, त्याची जबाबदारी आमची राहणार नाही, असेही त्यांनी सुनावले आहे. 

जिल्हाधिकारी म्हणतात, लॉकडाउनमुळे कोरोनाच्या रुग्ण वाढीस ब्रेक 

जळगाव : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 7 ते 13 जुलै दरम्यान जळगावसह भुसावळ, अमळनेर या ठिकाणी पाळण्यात आलेला "स्थानिक लॉकडाउन' उद्यापासून (ता. 14 जुलै) संपणार आहे. मात्र, जळगाव शहरातील सर्व व्यापारी संकुले बंदच राहतील. सकाळी 9 ते सायंकाळी 7 दरम्यान सम विषम तारखेनुसार दुकाने सुरू राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 

"कोरोना' संसर्गाची संख्या रोखण्यासाठी 7 ते 13 जुलै असा जळगाव, अमळनेर व भुसावळ शहरत स्थानिक लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्याची मुदत 13 जुलै रोजी रात्री संपत आहे. उद्यापासून (ता.14 जुलै) शहरातील व्यवसाय सुरू होणार आहे. मात्र बाजारपेठ पूर्ण वेळ सुरू न राहता सकाळी 9 ते सायंकाळी सातपर्यंत सुरू राहणार आहे. यात महापालिका क्षेत्रातील व्यापारी संकुले, मॉल बंद ठेवण्यात येणार आहेत. 

लॉकडाउनचा फायदा झाल्याचे सांगून जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की पूर्वी शंभर नागरिकांची तपासणी होत होती, तेव्हा 28 रुग्ण पॉझिटिव्ह निघत होते. आता 100 नागरिकांची तपासणी केली, तर 14 रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com