''ज्याला लोक "रामराज्य" समजतात ते खरं तर "रामभरोसे" राज्य आहे..

रुपाली चाकणकर यांनी योगी सरकार व भाजपवर निशाणा साधला आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-10T162505.282.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-10T162505.282.jpg

पुणे : उत्तरप्रदेशात पंचायत समितीच्या निवडणुकीत एका महिलेशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपवर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियातून या घटनेवरुन टिका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी योगी सरकार व भाजपवर निशाणा साधला आहे. ncp rupali chakankar slams cm yogi adityanath over misbehavior women

रुपाली चाकणकर आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''ज्याला लोक "रामराज्य" समजतात ते खरं तर "रामभरोसे" राज्य आहे. रामभरोसे राज्यात असलेल्या आंधळ्या सरकारमुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही. सीतेची ही हतबलता तिथे रोजचीच आहे.'' 

उत्तर प्रदेशात पंचायत समिती (ब्लॅाक प्रमुख) सभापतीसाठीच्या निवडणूकीची धामधूम सुरू आहे. सुमारे 825 समितींसाठी ही निवडणूक होणार आहे. पण अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी गुरूवारी विरोधकांनी एका महिलेशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती. महिलेच्या साडीला धरून ओढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सहा पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.  

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या महिला उमेदवाराच्या अर्जावर अनुमोदक म्हणून सही करण्यासाठी निघालेल्या महिला सदस्यासोबत हा प्रकार घडला आहे. समाजवादी पक्षाने भाजपच्या कार्यकर्त्यांनी महिलेची साडी ओढल्याचा आरोप केला आहे.  भाजप कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काल ट्विट केला आहे. 

लखीमपुर खीरी जिल्ह्यातील पसगवां ब्लॅाकमध्ये समाजवादी पक्षाकडून रितू सिंह या उमेदवारी अर्ज भरणार होत्या. त्यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून सही करणाऱ्या एक सदस्य कार्यालयात निघाली होती. पण विरोधी कार्यकर्त्यांनी त्यांची अडवणूक केली. हे कार्यकर्ते त्यांची साडी ओढत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अखेर या महिलेला अर्ज भरताच आला नाही. आपला उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी ही अडवणूक करण्यात आल्याचा दावा समाजवादी पक्षाकडून करण्यात आला आहे. 
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनीही योगी सरकारवर टिका करीत संताप व्यक्त केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com