शरद पवार पुन्हा ब्रीच कँडीमध्ये दाखल; उद्या होणार शस्त्रक्रिया 

शरद पवार यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता.
 Sharad Pawar .jpg
Sharad Pawar .jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले, असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. 

शरद पवार यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असून उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

पवार यांच्यावर ३० मार्चला  शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पोटात दुखत असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासण्या झाल्यानंतर डॅाक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचवेळी १५ दिवसानंतर दुसरी शस्त्रक्रिया करणार असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   

दरम्यान, ''राज्यात Maharashtra कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत ज्या सूचना आल्या आहेत, त्या नजरेसमोर ठेऊन निर्णय घेतले जातात. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की राज्य सरकारच्या प्रयत्नांना आपल्या सर्वांचे सहकार्य मिळावे.'' असे आवाहन पवार Sharad Pawar यांनी जनतेला केले होते. सर्व घटक अशा काळात अन्य सर्व गोष्टी बाजूला ठेऊन यंत्रणेला सहकार्य देतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला होता.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, "एवढी भयावह स्थिती या पूर्वी कधी नव्हती. देशातल्या कुठल्याही राज्यात इतकी भयानक स्थिती नाही. सक्रीय रुग्णांची वाढ चिंताजनक बाब आहे. याला तोंड द्यायलाच हवे. दिवसेंदिवस स्थिती गंभीर होते आहे. गेल्या वर्षी आपण कोरोनाला उत्तम तोंड दिले.

गेल्या वर्षीचा प्रादुर्भाव व आजची संख्या पाहिली तर आता वाढीचा वेग चिंताजनक आहे. राज्यातली आरोग्य यंत्रणेचे घटक डाॅक्टर Doctor, परिचारक, आरोग्य कर्मचारी अहोरात्र कष्ट करताहेत. रुग्णांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com