सुप्रिया सुळेंनी केले गार्गीचे गोड कौतुक...    - NCP MP Supriya Sule lauded Gargi  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

सुप्रिया सुळेंनी केले गार्गीचे गोड कौतुक...   

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 जुलै 2021

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या अनेक पोस्टवर गार्गीचा फोटो व्हायरल झाला.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या  (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. निवडणुकीत प्रचाराचे वारे वाहत असतांना राष्ट्रवादीचा झेंडा कुठलीही समज नसलेल्या गार्गीने हातात घेतला आणि शेताच्या बांधावर फडकविला. तो तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी गार्गीची दखल घेऊन तीचे कौतुक केले. (NCP MP Supriya Sule lauded Gargi)  

हेही वाचा : मंत्रिमंडळाच्या मेगाविस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची चतु:सूत्री

गार्गी ही चांदोरी ता. निफाड येथील प्रियंका व सागर आहेर या दाम्पत्याची मुलगी आहे. निवडणुकीत प्रचाराचे वारे वाहत असतांना राष्ट्रवादीचा झेंडा कुठलीही समज नसलेल्या गार्गीने हातात घेतला आणि शेताच्या बांधावर फडकविला. तो तिचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. गार्गी सोशल मीडियावर राष्ट्रवादीची चिमुरडी चाहती म्हणून भारी भाव खाऊन गेली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या 'सिल्व्हर ओक' या शरद पवार यांच्या निवास्थानी गार्गीची पवार यांच्याशी भेट झाली होती.

हेही वाचा : वाजपेयी असते तर, या भाजप आमदारांना घरी पाठवले असेत!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या अनेक पोस्टवर गार्गीचा फोटो व्हायरल झाला. आणि ३० जून रोजी सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त गार्गीने आपल्या हटके पध्दतीने शुभेच्छा दिलेल्या. त्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारे, बारामती येथील स्टर्लिंग सिस्टिम्स या आयटी कंपनीचे प्रमुख सतीश पवार यांना सुप्रिया ताईंनी या चिमुकल्या गार्गी संदर्भात विचारणा केली. आणि बुधवारी (ता. ७ जुलै) मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी गार्गी सह परिवाराची भेट घेत गार्गीचे गोड कौतुक करत संवाद साधला. यातुन ही राष्ट्रवादीसह सोशल मीडियावर सुप्रिया सुळे किती लक्ष देऊन असतात ही बाब अधोरेखित झाली.   

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख