जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी... सर्व परीक्षा रद्द करा... - ncp leader jitendra awhad on exams cm uddhav thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी... सर्व परीक्षा रद्द करा...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना संकट वाढत असल्याने राज्यात अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे दहावी, बारावी, एमपीएससी व अन्य परीक्षांना बसलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

''सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करतो,'' असे टि्वट आव्हाड यांनी केले आहे. 

महाराष्ट्रात कोरोना विषाणून संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढ आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात शनिवार आणि रविवारी वीकेंड लॉकडाउन करण्यात आला आहे.  महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल आणि दहावीच्या परीक्षा 29 एप्रिलपासून सुरु होणार आहेत. मात्र, वाढत्या कोरोनामुळे पालकांना भीती वाटतं आहे. पालकांनी कोरोन रुग्ण वाढत असल्यानं परीक्षा केंद्रावर जाणं धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.  

महाराष्ट्रात दररोज 40 ते ५०  हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना मुलांना परीक्षा देण्यास पाठवण्यावरुन पालकांमध्ये नाराजी आहे. माजी शिक्षण संचालक जे एम अभ्यकंर यांनी याविषयी बोलताना परीक्षा जून महिन्यात घेणं शक्य असल्याचं म्हटलं. जून महिन्यात परिस्थिती सामान्य असल्यास एका दिवशी दोन पेपर घेता येतील, असंही ते म्हणाले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख