सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय : जयंत पाटील - NCP Leader Jayant Patil Reaction on Bihar Election Results | Politics Marathi News - Sarkarnama

सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय : जयंत पाटील

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तेजस्वी यादव यांचे कौतुक केले आहे.

मुंबई : बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तेजस्वी यादव यांचे कौतुक केले आहे.

तेजस्वी यादव यांच्याकडून युवकांनी प्रेरणा घ्यावी असे सांगतानाच जयंत पाटील यांनी..
अभिनंदन ! Well done.. असे ट्वीट करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान जयंत पाटील यांनी 'मेरे हार की चर्चा होगी जरूर मैंने जीत के बाजी हारी है ।' असा शेयर सादर करत तेजस्वी यादव यांना प्रोत्साहन दिले आहे.

दरम्यान, खरे पाहता बिहारमध्ये पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी तसेच तेथील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणी निवडणूक लढवायचे ठरवले. पण नितीश कुमार यांनी मुद्दाम आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळू दिले नाही. ते मिळाले असते तर आम्हाला जास्त मते मिळाली असती, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

बिहारमध्ये शिवसेनेला खातेही उघडता न आल्यामुळे सेनेचे कोणीही आता प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. खैरे यांनी मात्र खुलेपणाने आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "पूर्वी जनसंघाचे निष्ठावान कार्यकर्ते आपले दिवा हे चिन्ह घराघरात जावे यासाठी चिकाटीने प्रयत्न करीत असत. जरी निवडणुक हरले, डिपॉझिट गमावले तरीही ते हार मानीत नसत, त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे पुढच्या निवडणुकांसाठी तेथे व्यूहरचना करून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आम्ही ही निवडणुक लढवली,''
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख