पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे कौतुक केले, पण फडणवीस टीका करतायत, योग्य कोण...  - NCP leader Jayant Patil criticizes Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे कौतुक केले, पण फडणवीस टीका करतायत, योग्य कोण... 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 9 मे 2021

फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता.

मुंबई: सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारचे कौतुक केले आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून सरकारवर टीका सूरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. (NCP leader Jayant Patil criticizes Devendra Fadnavis)

फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र ट्विट केले होते. या ट्विटला जयंत पाटील यांनी उत्तर दिले. या संदर्भात जयंत पाटील यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले की ''देवेंद्र फडणवीसजी आजच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही?'', असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा : जयंत पाटलांनी शब्द पाळला ; मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण सुरु

 
राज्यात 18 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणात येणाऱ्या अडचणिविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालायने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मुंबई महापालिकेने केलेल्या प्लानिंगचे कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची ही चर्चा महत्त्वाची मानली जात होती. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

हे ही वाचा : अशी परतवणार नाशिकमध्ये कोरोनाची तिसरी लाट!
 

 सर्वोच्च न्यायलयाने केले होते कौतुक

सर्वोच्च न्यायालयाने ऑक्सिजन व्यवस्थापनाबाबत मुंबईतील यंत्रणांचे कौतुक केले होते. मुंबईत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.  उपलब्ध ऑक्सिजनचा जास्तीत जास्त उपयोग, चांगल्याप्रकारे वितरण आणि बफर स्टॉक तयार करणे यासह मुंबई महापालिकेने विद्यमान संसाधने एकत्रित करण्याच्या क्षमतेमुळेच मुंबईला ऑक्सिजन समस्या जाणवली नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख