मोठी बातमी : एकनाथ खडसेंना ईडीचा दणका ; जावई गिरीश चैाधरींना अटक   - NCP leader Eknath Khadse's son-in-law Chaidhary arrested ED | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मोठी बातमी : एकनाथ खडसेंना ईडीचा दणका ; जावई गिरीश चैाधरींना अटक  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जुलै 2021

एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चैाधरी यांना ईडीने अटक केली आहे. काल रात्रभर त्याची ईडीकडून कसून चैाकशी केली जात होती. आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. भोसरी जमिन गैरव्यवहारप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. 

भोसरी जमिन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गिरीश चैाधरी यांना अटक झाल्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सीडी लावण्याचा इशारा देण्याऱ्या खडसेंना ईडीनं दणका दिला आहे. खडसे हे जेव्हा महसूलमंत्री होते तेव्हा त्यांनी  पती मंदाकिनी व अन्य कुटुबियांच्या नावावर गैरव्यवहार करून भोसरी येथील जमिन विकत घेतली असा आऱोप त्यांच्यावर आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन  
मुंबई :  ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (वय ९८)  यांचे आज मुंबईत सकाळी साडेसात वाजता हिंदुंजा रूग्णालयात निधन झाले. ता. २९ जून रोजी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठा दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. आज सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो या त्यांच्या पत्नी होत. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख