शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीवर राष्ट्रवादीने केला 'हा' खुलासा  

गुजरात मधील केवडीया येथील एका नियोजित कार्यक्रमासाठी शरद पवार अहमदाबादला गेल्याचे समजते.
 Sharad Pawar, Amit Shah .jpg
Sharad Pawar, Amit Shah .jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांची अहमदाबाद येथे केंद्रीय गृहमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नाही. ही अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

गेले दोन दिवस ट्वीटरवर बातम्या पसरवण्यात आल्या आणि एका वर्तमान पत्रामध्ये लहान बातमी प्रसारीत करुन वृत्त वाहिन्यांवर बातम्या दाखवायला सुरुवात करण्यात आली. एका पत्रकाराकडून प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतः अमित शहा यांनी केला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. 

ज्या बातम्या पसरवण्यात आल्या त्या खोट्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाही. आणि भेटण्याचा उद्देश किंवा कारण असू शकत नाही, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान गुजरात मधील केवडीया येथील एका नियोजित कार्यक्रमासाठी शरद पवार अहमदाबादला गेल्याचे समजते. मात्र हा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर ते लगेच परत मुंबईत परतले. या काळात त्यांची व अमित शहा यांची बिल्कुल भेट झाली नाही. असे खात्रिलायक सुत्रांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधे हेतुपुर्वक गैरसमज पसरवण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे या सुत्रांनी सांगितले आहे. 

अमित शहा काय म्हणाले होते? 

त्यातच काल शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. आज शहा यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही भेट झाल्याचे नाकारले नाही. पत्रकारांनी त्यांना या भेटीबाबत विचारले असता त्यांनी `प्रत्येक भेटीतील चर्चा सार्वजनिक करता येत नाही,` असे म्हणत अधिक बोलायचे टाळले. पण शहा यांनी थेट शब्दांत ही भेट झाली नसल्याचेही अमान्य केले नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com