सत्तेसाठी फडणवीस तळमळताहेत..खडसेंचा टोला.. - ncp eknath khadse taunt bjp devendra fadnavis forming government with ajit pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

सत्तेसाठी फडणवीस तळमळताहेत..खडसेंचा टोला..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 जून 2021

भाजपचे आमदार अस्वस्थ आहेत, आपलं सरकार येणार असे आमदारांना सांगून वेळ काढत आहे,

मुंबई :  "महाविकास आघाडी सरकार आल्यापासून चंद्रकांत पाटील,  देवेंद्र फडणवीस म्हणतात, सरकार पडणार,...पण सरकार पडत नाही, दिवसेंदिवस सरकार मजबूत होत आहे, फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत," असे टोमणा राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावला आहे.  खडसे आज माध्यमांशी बोलत होते. ncp eknath khadse taunt bjp devendra fadnavis forming government with ajit pawar

खडसे म्हणाले की, सत्तेत आलं पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे. आजही एखाद्या पक्षाने त्यांना सरकार स्थापन करण्याची आँफर दिली तर ते त्यांच्यासोबत सरकार स्थापन करायला तयार होतील. 

अजित पवार यांच्या सोबत सत्ता स्थापन करणे ही चूक होती, असं फडणवीस नुकतेच स्पष्ट केलं आहे.  यावर एकनाथ खडसेंनी निशाणा साधला. ते म्हणाले की, कोणत्याही कारणाने सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजितदादांसोबत सरकार स्थापन केलं. आता त्यांनी चूक मान्य केली आहे. भाजपचे आमदार अस्वस्थ आहेत, नाराजांची संख्या वाढू नये, म्हणून आपलं सरकार येणार असे आमदारांना सांगून भाजप वेळ काढत आहे, अशी टीका केली.  एकनाथराव खडसे यांनी आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.  या वेळी त्यांनी महाविकास आघाडी ही मजबूत आहे.  या सरकारला कोणताही धोक्का नाही, असेही ते म्हणाले.  

"सरकार पडणार असल्याच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सरकार पडणार यांच्या दोन तारखाही दिल्या, फडणवीसांनीही तारीख निश्चित केली, पण काही होत नाही. सरकार काही जात नाही. विरोधक वाटच बघत राहणार," असे खडसे म्हणाले.   

UPच्या राजकारणात नक्की चाललंय काय ?  
 नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप पक्षातील काही नेत्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर Yogi Adityanath केला आहे. मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्याची मागणी समोर आल्यानंतर उत्तरप्रदेशातील राजकीय घडामोडींकडे सगळ्याचे लक्ष आहे. पक्षातंर्गत तक्रारी, भाजप-राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या बैठकी, आगामी विधानसभा निवडणूक यामुळे उत्तरप्रदेशातील राजकारणात नक्की काय सुरू आहे, याची चर्चा रंगली आहे. 
   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख