Breaking मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स   - NCB summoned Minister Nawab Malik son-in-law | Politics Marathi News - Sarkarnama

Breaking मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स  

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावलं आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावलं आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

समीर खानच लग्न नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांच्याशी झालं आहे.  समीर खान आणि करण संजानी यांच्यात गुगल पे द्वारे २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. अशी माहिती एनसीबीच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे ड्रग्स पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाला असल्याचा संशय एनसीबीला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावल्याचं सांगितलं जातं. 

एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

त्याशिवाय मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यालाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केली आहे. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं आहे. 

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख