मुख्यमंत्र्यांचा अपमान सहन केला जाणार नाही; कायदेशीर कारवाई होईलच! 

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर नवाब मलिक यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.
Nawab Milk criticizes Narayan Rane .jpg
Nawab Milk criticizes Narayan Rane .jpg

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा करण्यात आलेला अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही असे सांगतानाच, कोण कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Milk) यांनी दिली. (Nawab Milk criticizes Narayan Rane)  

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर नवाब मलिक यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपकडून हिंसक राजकारण करण्यात आले. वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आले त्याचपध्दतीने भाजप महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता हे स्वीकारणार नाही. असा इशाराही मलिक यांनी दिला.

नारायण राणे यांनी जी भाषा वापरली आहे ती अशोभनीय आहे. ही भाषा व हे राजकारण महाराष्ट्र कधी स्वीकारत नाही. हे भाजपला कळले पाहिजे असा टोलाही  मलिक यांनी लगावला आहे.  

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राणे यांच्याविरोधात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांचे एक पथक त्यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले आहे. या पथकामध्ये दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. याप्रकरणी शिवसेनेचे पुणे युवा सरचिटणीस रोहित रमेश कदम (रा. पाषाण) यांनी तक्रार दिली आहे.  

दरम्यान, महाडमध्ये राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारली आहे. त्यावरून राणे यांना प्रश्न विचारला असता राणे म्हणाले, 'ज्यांना स्वातंत्रदिन कधी हे माहिती नाही त्यांच्याविषयी मी बोलणार नाही. स्वातंत्र्यदिन माहित नसलेल्यांनी आम्हाला सल्ले देण्याचा प्रयत्न करू नये. त्यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेवून बोलायला हवे. स्वातंत्र्याचा हिरकमहोत्सव काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती, असे राणे यावेळी बोलताना म्हणाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com