निवडणूक आणि भावनेच्या राजकारणामुळेच देशात कोरोना वाढला! - Nawab Malik's criticism of Prime Minister Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

निवडणूक आणि भावनेच्या राजकारणामुळेच देशात कोरोना वाढला!

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 मे 2021

नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपध्दत योग्य नाही. 

मुंबई : आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठलेही नियोजन नाही. नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपध्दत योग्य नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

निवडणूकांसाठी व भावनेच्या राजकारणासाठी ही सगळी परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली आहे. लसीचे उत्पादन आपल्याकडे कमी असताना इतर देशांना लस देण्यात आली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

शरद पवार म्हणाले, हा तर रडीचा डाव!

आता हे सगळे सोडून देशामध्ये जे कोरोनाचे संकट आहे. या आरोग्य आणीबाणीत केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्यांची एकजूट करावी आणि त्याच्यातून निश्चित धोरण तयार करून कोरोनावर मात देता येईल असा कार्यक्रम तयार करावा अशी, सूचनाही नवाब मलिक यांनी केली आहे. कोरोनाला रोखणे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्य नाही. त्यासाठी एक धोरण ठरवले गेले पाहिजे, असेही मलिक म्हणाले.

रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराची पत्नी बनली आमदार!
नवाब मलिक म्हणाले, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठा हिंसाचार घडवला आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या गोळीबारात ६ लोकांचा जीव गेला. तेव्हा ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळी शहा म्हणाले होते की, जेव्हा जनता आम्हाला राजीनामा मागेल तेव्हा आम्ही देऊ. त्यामुळे बंगालच्या जनतेने भाजपला नाकारले आहे. इतकी मोठी हार भाजपची झाली, तेव्हा आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागीतला आहे. त्यामुळे अमित शहा यांनी आता राजीनामा द्यावा, असा टोला मलिक यांनी अमित शहा यांना लगावला आहे.

पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन वर्षापासून अमित शहा आभास निर्माण करून नेहमीच आकडे फेकून अबकी बार दो सौ के पार असे बोलून, फेकाफेकीचे राजकारण करतात, याचे उत्तर त्यांनी दिले पाहीजे. गुजराती लोक जसे आकडे फेकतात, तसे आकडे फेक शहा करत होते. ते प्रत्येकवेळी आकडे फेकतात पण त्यांचा एकही मटका लागत नाही, असेही मलिक म्हणाले.     
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख