'शरद पवार राष्ट्रपती होणार' या बातम्यांमध्ये तथ्य नाही! - nawab malik says sharad pawar being a presidential poll candidate are baseless | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

'शरद पवार राष्ट्रपती होणार' या बातम्यांमध्ये तथ्य नाही!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जुलै 2021

राष्ट्रपती पदाबाबत कधीही चर्चा झाली नाही किंवा इतर पक्षांसोबतही चर्चा झालेली नाही.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार Sharad Pawarहे राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक nawab malik यांनी दिली. याबाबत मलिक यांनी खुलासा केला आहे. 

कालपासून प्रसारमाध्यमातून शरद पवार राष्ट्रपती होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याबाबत आज नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या राष्ट्रपती पदाची निवडणूक नाही. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काय परिस्थिती असेल ते स्पष्ट होईल. मात्र पक्षांतर्गत राष्ट्रपती पदाबाबत कधीही चर्चा झाली नाही किंवा इतर पक्षांसोबतही चर्चा झालेली नाही. या बातम्यांमध्ये तथ्य नाही असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत न उतरण्याचं शरद पवारांनी सांगितलं कारण...
नवी दिल्ली : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुढील लोकसभा निवडणुकीतील नेतृत्वाबाबत अथवा राष्ट्रपती पदाबाबतच्या उमेदवारीविषयी ही भेट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर पवारांनी अखेर खुलासा केला आहे. 

अमिताभ बच्चन यांच्याकडून मनसेला मोठेपणा दाखविण्याची 'प्रतिक्षा'  
 मुंबई : बॉलिवूडचे महानायकअमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या संरक्षक भिंत रस्ता रुंदीकरणात येत आहे. ही भिंत पाडावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे. रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अन्य इमारतींवर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली तीच कारवाई महानगरपालिकेने महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर का केली नाही, असा प्रश्न  मनसेनी पोस्टरच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला विचारला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख