विधानसभा अध्यक्षपदाबाबत नवाब मलिक यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. दोन दिवसाचे अधिवेशन असले तरी याच अधिवेशनात कार्यक्रम करता येईल, यावर विचारविनिमय सुरू असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
 Nawab Malik .jpg
Nawab Malik .jpg

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविलेल्या पत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  हे पद काँग्रेसकडे असून, अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याच अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे सांगितले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाष्य केले आहे. (Nawab Malik said that we will win the election of the Speaker of the Assembly by a majority)

मलिक म्हणाले की, आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल. परंतु आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती. त्यापेक्षा जास्त मताने जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सुचवले आहे. निश्चितरुपाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. दोन दिवसाचे अधिवेशन असले तरी याच अधिवेशनात कार्यक्रम करता येईल, यावर विचारविनिमय सुरू असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. 

राज्यपाल विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्ष पदाची निवडणूक लवकर करा असे सूचित करत आहेत. मात्र विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत तोपण विषय प्रलंबित आहे. तो निकाली काढलात तर १२ आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील, असे सांगतानाच असा आमचा आग्रह वारंवार राहिला आहे. असेही मलिक म्हणाले. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊच पण त्याअगोदर १२ आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा, अशी विनंती मलिक यांनी राज्यपालांना केली आहे. 

दरम्यान, पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष निवड या विधिमंडळ अधिवेशनात होणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा 5 जुलैला होईल. काँग्रेसमध्ये कुठलीही अंतर्गत नाराजी नाही. मी मंत्रिपदाची मागणी केली नाही. पक्ष देईल ती जबादारी मी पार पाडत आहे आणि माझ्यावर कोणताही मंत्री  नाराज नाही. महाविकास आघाडी मध्ये कुठलीही नाराजी नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली असून, यात अधिवेशन आणि इतर विषयांवर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात नवे धोरण आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com