मॉडर्ना लसीला परवानगी नसताना मुंबईत फ्रान्सच्या नागरीकांचे लसीकरण!

तीनच कंपन्यांना परवानगी असताना Moderna ची लस कशी काय दिली जातेय असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 Nawab Malik .jpg
Nawab Malik .jpg

मुंबई : देशात फक्त तीनच कंपन्यांना लसीला परवानगी असताना मुंबईतील फ्रान्सच्या नागरीकांना मॉडर्ना (Moderna) ची लस देण्याचे काम कुठल्या पध्दतीने सुरू आहे. जर जनतेला परवानगी मिळत नाही, मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का? याचा खुलासा केंद्रसरकारने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे. (Nawab Malik criticism of the central government) 

देशात लस तुटवडा असल्याचे केंद्रसरकार सांगतेय. केंद्रसरकारने भारत बायोटेक आणि सिरम इन्स्ट्यिट्यूट (Serum Institute) व स्फुटनिकच्या लसीला परवानगी दिली आहे. असे असताना या देशात आणि मुंबईच्या आजुबाजुला Moderna कंपनीच्या लसीचे लसीकरण सुरू आहे, अशी माहिती उपलब्ध झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

विशेषतः फ्रान्स या देशातील नागरीक भारतात व मुंबईत आहेत. त्यांना Moderna ची लस देण्यासाठी काही रुग्णालयामध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दुतावासातील नागरीकांचे भारतीय नातेवाईकांनाही लसीकरण (Vaccination) करण्यात येत आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले. तीनच कंपन्यांना परवानगी असताना Moderna ची लस कशी काय दिली जातेय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, देशात १८ वर्षापुढील नागरिकांना लस देण्यास सुरूवात झाल्यानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रामध्ये कोव्हॅक्सिन लशीचे पुरेसे डोस नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी आलेले डोस आता ४५ वर्षांपुढील नागरिकांना दिले जाणार आहेत. दिल्ली व इतर राज्यांमध्ये लशीचा तुटवडा असल्याने अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. तर लस उपलब्ध असलेल्या केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड उत्पादन इतर कंपन्यांना करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com