राज्यपालांनी राजकीय उद्देशाने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र  - Nawab Malik criticism of Governor Bhagat Singh Koshyari letter | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपालांनी राजकीय उद्देशाने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जुलै 2021

नवाब मलिक यांनी राज्यपाल कोश्यारींच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : ''ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही,'' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपाल कोश्यारींच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. Nawab Malik criticism of Governor Bhagat Singh Koshyari letter

दरम्यान राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र राजकीय उद्देश ठेवून लिहिण्यात आले असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. ''ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्यपालांनी पत्रात उल्लेख केला आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्याच्या निर्णयामुळे नाही हे त्यांना माहीत असायला हवे होते," असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.  

IAS अधिकारी चांदणी चंद्रन यांनी सांगितली "एका लग्नाची गोष्ट" 
नवी दिल्ली  : महिला आयएएस IAS अधिकारी चांदणी चंद्रन यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतानाचा एक फोटो टि्वटर शेअर केला आहे. या फोटोची सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगली आहे. चांदणी या २०१७च्या बॅचच्या आयएएस IAS अधिकारी आहेत. सध्या त्या त्रिपुरा येथील कंचनपूर येथे उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहेत. हा फोटो शेअर करीत असताना त्यांनी  IAS बनण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला याची माहिती दिली आहे. या एका फोटोमुळे त्यांचे आयुष्य कसे बदलले यांची रंजक माहिती त्यांनी शेअर केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख