नाथाभाऊ म्हणतात, मी आजही भाजपतच, राष्ट्रवादीकडून कोणताही निरोप आलेला नाही ! 

खडसे हे येत्या 22 ऑक्‍टोबररोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
नाथाभाऊ म्हणतात, मी आजही भाजपतच, राष्ट्रवादीकडून कोणताही निरोप आलेला नाही ! 

मुंबई : "" मला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोणताही निरोप आलेला नाही. राष्ट्रवादीसोबची चर्चा अजूनही पूर्ण झालेली नाही अशी माहीती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनात खडसे यांनी सामला सांगितले. 

गेल्या काही दिवसापासून खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खडसे यांच्या समर्थकांनी नाथाभाऊ आता भाजपमध्ये थांबणार नाहीत असा सुतोवातच केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांच्यामध्ये मतभेद आहेत. राज्यात 2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर खडसे यांना वाटत होते की, आपल्यला मुख्यमंत्री बनविले जाईल पण, तसे काही झाले नाही. फडणवीस हे मुख्यमंत्री बनल्यानंतर ते नाराज होते. 

नाराज खडसे यांनी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महसूलसह महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी शेवटी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देऊन ते बाहेर पडले होते. 

नाराज खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा असतानाच चंद्रकांत पाटील यांनी ते पक्ष सोडून कोठेही जाणार नाहीत असे  काही दिवसापूर्वी म्हटले होते. तरीही खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा काही थांबली नाही. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी सामशी बोलताना ते म्हणाले, की मला राष्ट्रवादीकडून कोणताही निरोप आलेला नाही. तशी चर्चा अजूनही झालेली नाही. मी अद्याप भाजप सदस्यपदाचा राजीनामा दिला नाही. 

खडसे हे येत्या 22 ऑक्‍टोबररोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 

हे ही वाचा:  खडसे सेनेत आले काय किंवा राष्ट्रवादीत, दोन्ही सारखेच : अब्दुल सत्तार

जालना : एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले काय आणि शिवसेनेत आले काय, एकसारखेच आहे. महाविकास आघाडीत येण्यासाठी अनेक पहिलवान तयार असून ज्यांना महाविकास आघाडीतील ज्या पक्षात जायचे आहे तिथे त्यांनी जावे, असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खडे यांना उद्देशून केले.

सत्तार यांनी आज जालना तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या कुंभेफळ,अंतरवाला, भागांत जाऊन कपाशी आणि सोयाबीन पिकांची पाहणी केली.तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. 

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. अखेर खडसे यांनी भाजपच्या सदत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. खडसे भाजपमध्ये नाराज आहेत हे सत्य अनेकवेळा समोर आले आहे. त्यामुळे ते पक्षांतराचा विचार करत असल्याची चर्चा आहे. खडसे शिवसेनेत जाणार अशीही एक चर्चा होती. त्याबाबत अब्दुल सत्तार यांनी खडसे यांना वरीलप्रमाणे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com