ज्या पक्षावर जिवापाड प्रेम केले तो भाजप सोडताना नाथाभाऊ भावूक ! 

केवळ आणि केवळ फडणविसांमुळेच माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली असेही वारंवार खडसे सांगत होते
ज्या पक्षावर जिवापाड प्रेम केले तो भाजप सोडताना नाथाभाऊ भावूक ! 

पुणे : " हो, केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मला भाजप सोडावा लागला. माझी पक्षावर निष्ठा होती. आयुष्यात मी कधीही भाजपविरोधात बोललो नाही असे सांगतानाच गेल्या चाळीस वर्षापासून ज्या पक्षात राहिलो. तो पक्ष सोडताना दु:ख निश्‍चितपणे होत आहे असे सांगताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काहीसे भावूक झाले होते. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या त्रासामुळे आणि खोटेनाटे आरोप केले. माझ्या वाट्याला बदनामी आली. माझ्यावर बोगस विनयभंगाचा खटला दाखल केला याला फडणवीस हेच जबाबदार आहेत. आता या खटल्यातून काही दिवसापूर्वी मी बाहेर पडलो आहे. जर या खटल्यात मला तीन वर्षे शिक्षा झाली असती तर माझे आयुष्य उद्धवस्त झाले असते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

केवळ आणि केवळ फडणविसांमुळेच माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली असेही वारंवार खडसे सांगत होते आणि हो जे मला सांगत आहेत की मला पक्षाने पदे दिली. पण, कोणी माझ्यावर कोणी उपकार केले नाही. मला माझ्या मेहतीने ही पदे मिळाली आहेत. माझं जीवन उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला गेला यामुळे व्यथित झालो होता. मला चार वर्षे जो मानसिक दिला. तो कोणी दिला हे सांगण्याची गरज आहे का ? 

 भाजपमधील एकटे चंद्रकांतदादा पाटील यांनी फोन केला होता. त्यांच्याशिवाय कोणीही मला फोन केला नाही आणि कोणीही चर्चा केली नाही असेही खडसे यांनी सांगितले. 

मी पक्ष सोडला नाही, तर पक्षाने मला बाहेर ढकलले असेही खडसे यांनी सांगितले. आज मी भाजप सोडला आहे. पण, पक्ष का सोडला ? माझा गुन्हा काय असा सवालही त्यांनी केला. मी भाजपमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच नाराज होतो हे सांगण्यासही ते विसरले नाही. त्यांच्या बोलण्यातून फडणवीस यांच्यावरील राग दिसून येत होता. 

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला आहे. त्यांचा प्रवेश अंधारात नव्हे तर उजेडात होणार आहे,'' अशी कोपरखळी जयंत पाटील यांनी भाजपला मारली आहे. 

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची माहीती देण्यासाठी पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी खडसे यांनी भाजपला दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. खडसे यांच्या पाठोपाठ हळूहळू आणखीही नेते पक्षात येतील. आताच नाव उघड करणार नाही अशी माहीती जयंत पाटील यांनी दिली. 

काहीवेळापूर्वीच खडसे यांनी सामला सांगितले होते, की मी उदया सकाळी मुंबईच्या दिशेने निघणार आहे. राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा मुहूर्त राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे ठरवतील अशी माहीती भाजपचे ज्येष्ठ नाराज नेते एकनाथ खडसे यांनी दिली होती. त्यानंतर काही वेळात पत्रकार परिषद घेऊन पाटील यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाची माहीती दिली. 

पाटील म्हणाले, की आम्ही पक्षात खडसेसाहेबांचे स्वागत करीत आहोत. त्यांनी गेल्या तीन दशकापासून भाजपमध्ये काम केले आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांनी पक्ष वाढविला आहे. ते एक अभ्यासू नेते आहेत. पक्षात येत आहेत याचा निश्‍तितच आनंद आहे. 

त्यांच्यावर पक्ष कोणती जबाबदारी देणार असे विचारले असता ते म्हणाले, की आज प्रवेश आहे. कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय लवकरच होईल. भाजपने त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com