''ऑक्सिजनचे ऑडिट करा...'' पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना - Narendra Modi has instructed to conduct an audit of oxygen | Politics Marathi News - Sarkarnama

''ऑक्सिजनचे ऑडिट करा...'' पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

ऑक्सिजन एअर लिफ्टिंग करून मिळेल का ?

मुंबई : देशभरात कोरोनाला रोखण्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मॅरेथॉन बैठका घेतल्या. चार तासात तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा, मृत्यूदर, ऑक्सिजनचा पुरवठा याची मोदींनी घेतली. ज्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा दहा राज्यातील मुख्यमंत्र्याशी मोदींनी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीस उपस्थित होते. बैठकीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

राजेश टोपे म्हणाले, ''राज्याला न्याय हक्काप्रमाणे रेमडेसिवर, ऑक्सिजन,  कोरोना लस मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान यांनी ऑक्सिजन बाबत काय पर्याय असतील याबाबत चर्चा करून ठरवू असे आश्वासन दिले आहे. ऑक्सिजन एअर लिफ्टिंग करून मिळेल का अशी मागणी यावेळी करण्यात आली. रिकामे टँकर विमानात हवाईदलाच्या माध्यमाने नेता येतील का, अशी मागणी करण्यात आली.  पंतप्रधान यांनी ऑक्सिजन बाबत काय पर्याय असतील याबाबत चर्चा करून ठरवू असे आश्वासन दिले आहे.''

ऑक्सिजनचे ऑडिट करा, अशी सूचना पंतप्रधान मोदींनी केली आहे. आहेत. एका राज्यातून अन्य राज्यात ऑक्सिजन जात असतांना अडवणूक होणार नाही या सूचना करण्यात आल्या आहेत. रेमडेसिवर योग्य प्रमाणात दिल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे. कोरोनाच्या लढाईत सर्वांनी एकत्रितपणे एकजुटीने काम करण्याची गरज आहे, पंतप्रधानांनी सांगितले, वन नेशन वन रेट वॅक्सिन बाबत राज्यांनी मोदींकडे मागणी केली आहे. गरिबांना मोफत लस देण्यासाठी निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मुख्यमंत्री भारत बायोटेकशी लशींची किंमत आणि पुरवठा याबाबत बोलणार आहेत,'' असे टोपे यांनी सांगितले.  शरद पवार यांनी साखर कारखान्यांना ऑक्सिजन प्लँट सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे टोपे म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख