नरेंद्र मोदी यांनी केला रामदास आठवलेंना फोन  - Narendra Modi called Ramdas Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदी यांनी केला रामदास आठवलेंना फोन 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान मोदी यांनी आठवले यांना प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा शुभेच्छा दिल्या. 

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. उपचारानंतर कोरोनावर मात करत ते घरीही परतले आहेत. त्यांच्या तब्येत्तीत आता सुधारणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवले यांना दूरध्वनी करून तब्येतीची चौकशी केली. 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना 12 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस आठवले हे होम क्वारंटाईन राहिले. याबाबतची माहिती आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी आठवले यांना तब्येतीची काळजी घ्यावी आणि प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा शुभेच्छा दिल्या. 

संविधान दिनी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय घ्या  : आठवले 

राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नतीमधील आरक्षण संविधान दिनाचे औचित्य साधून येत्या 26 नोव्हेंबर रोजी देण्याचा निर्णय घ्यावा, अशा मागणीचे पत्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पदोन्नतीबाबत राज्य सरकारच्या मंत्रीगटाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे. 

कर्नाटकसारख्या अन्य राज्यांनी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा प्रश्न सोडविला असून इतर अनेक राज्यांत मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षण देण्यात येत आहे. महाराष्ट्रात याबाबत राज्य सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, असे आवाहन या पत्रातून आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले आहे. 

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील 33 टक्के जागा मागील 3 वर्षांपासून रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. त्या जागा भरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकार निर्णय घेऊ शकते. त्याच प्रमाणे केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेण्याचे राज्य सरकारला कळविले आहे, असे आठवले यांनी या पत्रात म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख