मी गुन्हा केलेला नाही ; शिवसेनेला घाबरत नाही..राणेंचे प्रत्युत्तर

माझ्यावर कोणताहीगुन्हा दाखल झालेला नाही. मुख्यमंत्र्यांना देशाचा अमृतमहोत्सव माहित नाही.
मी गुन्हा केलेला नाही ; शिवसेनेला घाबरत नाही..राणेंचे प्रत्युत्तर
2rane_11.jpg

मुंबई : ''माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला याची मला माहिती नाही. कोण सुधाकर बडगुजर? त्यांना मी ओळखत नाही. काही माध्यमांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. माझी बदनामी करणाऱ्या माध्यमांवर मी गुन्हा दाखल करेल, असा इशारा त्यांनी दिला.  राणेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते बोलत होते. 

राणे म्हणाले की, मी कुठल्याही माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याचं मला माहित नाही. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मुख्यमंत्र्यांना देशाचा अमृतमहोत्सव माहित नाही. मी शिवसेनाला घाबरत नाही. नाशिकच्या पोलिसांनी आदेश काढला आहे. नाशिक पोलिस अधिक्षक आदेश काढतात ते काय राष्ट्रपती आहेत काय ? या देशात घटनेचे राज्य आहे. न्यायालय सगळ्यासाठी उपलद्ध आहे.  ते आमच्यासाठीही आहे.  

मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जमीनासाठी राणे अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी मधील प्रमुख नेत्यांमध्ये काल रात्री झाली चर्चा करण्यात आली. राणेंनी केलेली वक्तव्यावर आता भूमिका घेतली नाही तर जनतेच संदेश वाईट जाईल, याबाबत चर्चा झाल्याचे समजते. याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे. शिवसैनिकांना कायदा हातात न घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्याची माहिती आहे. 

 केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी जनआशिर्वाद यात्रेदरम्यान शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर टीका केली आहे.मुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. यावरुन शिवसेना आणि राणे यांच्यात वाद पेटला आहे. राणे यांच्यावर शिवसेनेकडून राज्यभर ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेना पुढे आली आहे. आत्तापर्यंच राणेवर तीन ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहे. राणेंना अटक होईल का, हे लवकरच समजेल.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in