भाजप खासदार नारायण राणेंनी घेतली शरद पवारांची भेट..

भाजप खासदार नारायण राणे यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
sp31.jpg
sp31.jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. आज त्यांची प्रकृती उत्तम आहे. आज सकाळी वृत्तपत्रांचे वाचन करतानाचा फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केला असून पवार अत्यंत प्रसन्न मुद्रेत असल्याचे या फोटोवरुन जाणवत आहे. 

माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. नारायण राणे हे पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. राजकारणात वैचारिक भूमिका वेगळ्या असल्या तरी व्यक्तीगत मैत्री जपताना नेते दिसतात, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये शरद पवार यांच्यासोबत नारायण राणे होते. 

काल रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचेही छायाचित्र सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केले होते. पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी येथे शरद पवार यांच्यावर एंडोस्कोपीनंतर मंगळवारी रात्रीच शस्त्रक्रिया करण्यात आली. पवारांना पोटदुखीचा जास्त त्रास होऊ लागल्याने आणि काही मेडिकल कॉम्पलिकेशन्स निर्माण झाल्याने शस्त्रक्रिया बुधावारी करण्याऐवजी मंगळवारी रात्रीच करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी फोटो टि्वट केला आहे. ब्रीच कँडीमध्ये पवारांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे.

राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी शरद पवारांच्या प्रकृतीबाबत फोन केला नाही... 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती, पवारांनी त्याचे टि्वटवरून आभार मानले होते. दिल्लीतील एकाही नेत्याने विशेषतः राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची चैाकशी केली नाही, असे टि्वट करून भाजपचे आमदार अतूल भातखळकर यांनी महाविकास आघाडीतील घटक पत्र असलेल्या काँग्रेसला टोला हाणला आहे.
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com