उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उद्धवस्त करायला निघालेत!

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आण्यासाठी जनता आज उपस्थित आहे.
उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उद्धवस्त करायला निघालेत!
Narayan Rane, Uddhav Thackeray .jpg

मुंबई : आज (ता. १९ ऑगस्ट) जनआशिर्वाद यात्रा निघते आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता जनता आताच्या सरकारला कटांळलेली आहे. हे सरकार या राज्याचा कुटल्याही प्रकारे विकास करु शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नावाप्रमाणे राज्याला उद्धवस्त करायला निघाले आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. (Narayan Rane criticizes Uddhav Thackeray) 

मुंबई विमानतळावर नारायण राणे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

यावेळी राणे म्हणाले, महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आण्यासाठी जनता आज उपस्थित आहे. एकच सांगतो महाराष्ट्राच्या जनतेच्या आशिर्वादाने हे पद आहे. राज्याचा विकास करता येईल. राज्याला देशाला विकासाकडे घेऊन जाता येईल. जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मी या मंत्रिमंडळात माझ्या विभागाचे काम करत असताना महाराष्ट्राचे नाव दिल्लीत केल्याशिवाय राहणार नाही, असेही राणे यांनी सांगितले. मला केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे, असेही राणे यांनी सांगितले. 

पहिल्यांदाच मी मुंबईपासून दिड महिना लांब राहिलो. आज महाराष्ट्रात जनतेचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या उद्देशाने मला पाठवले आहे. तो उद्देश पूर्ण करणार आहे. तुम्ही सर्वांनी मला आशिर्वाद द्यावे. गर्दी करा पण, कोरोनाचे नियम पाळा. महाराष्ट्र उद्धवस्त करायला निघाले आहे, त्यांना आपण आज सांगू की राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे, असेही राणे यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.