राणे मंत्री झाले आणि सेनेने बैठका सुरू केल्या..

नारायण राणेंची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर शिवसेनाभवनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-08T154529.371.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-08T154529.371.jpg

मुंबई : माजी मुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि कपिल पाटील यांना मोदी सरकारने मंत्रिमंडळामध्ये संधी देऊन महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या शिवसेनेला शह देण्यासाठी पूर्ण रणनीती आखली असल्याचे सध्या बोलले जात आहे.  राणेंची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर शिवसेनाभवनामध्ये मात्र बैठकांचे सत्र सुरू आहे.  

नारायण राणे हे मुंबई आणि कोकणातल्या अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. शिवाय मराठा नेते म्हणून नारायण राणे यांची विशेष ओळख आहे अशाच मुंबई आणि कोकणावर सध्या असलेले शिवसेनेचे वजन कमी करण्यासाठी नारायण राणे यांना थेट केंद्रात मंत्रीपद देण्यात आल्याचं बोललं जातंय. शिवाय ठाण्यामध्ये आणि भिवंडी मध्ये शिवसेनेचा बोलबाला कमी करण्यासाठी कपिल पाटील यांची देखील वर्णी लावली असल्याची चर्चा आहे. 
 
सोमवारी सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपच्या बारा आमदारांच्या केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात संबंध आणखी ताणले गेले. शिवाय दोन दिवसांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला नंतर बुधवारी थेट नारायण राणे यांची वर्णी केंद्रात लागून मंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेची राजकीय कोंडी करण्याचा चक्रव्यूह सध्या भाजपने आखले असल्याचा कळतय . मात्र याचा कोणताही फरक शिवसेनेला पडणार असं मत शिवसेनेचे नेते व्यक्त करताना दिसतात. 

मराठा, आगरी वोट बँकवर भाजपचं लक्ष
नारायण राणे यांची वर्णी लागल्यानंतर शिवसेनाभवनामध्ये मात्र बैठकांचे सत्र सुरू असलेला दिसते.  मुंबई आणि कोकणासाठी राणे तर ठाणे भिवंडी पालघरसाठी कपिल पाटील यांचा वापर भाजप करणार असल्याची चर्चा आहे. नारायण राणे यांच्यामुळे मराठा तर कपिल पाटील यांच्यामुळे आगरी वोट बँकवर भाजप लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

मुंडे, खडसे हसत राहिल्या अन् भारती पवार मंत्री झाल्या !  
नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डाँ. भारती पवार यांची काल केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. त्यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. तर दुसरीकडे खासदार डाँ. प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नाही, यावरुन सोशल मीडियात चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारती पवार यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी उलटसुलट चर्चा करीत आहेत. 
Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com