ऐतिहासिक क्रांती मैदानातून नाना क्रांती घडवणार 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार नाना पटोले, कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष हे शुक्रवार (ता. १२ फेब्रुवारी) रोजी दुपारी २.३० वाजता ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे, आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत.
Nana Patole .jpg
Nana Patole .jpg

पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार नाना पटोले, कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष हे शुक्रवार (ता. १२ फेब्रुवारी) रोजी दुपारी २.३० वाजता ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे, आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली. प्रदेशाध्यपदाचा पदभार स्वीकारण्याचा जाहीर कार्यक्रम अनेक वर्षात प्रथमच होत आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९४२ मध्ये मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून ''अंग्रेजो चलो जावो, भारत छोडो'' हा नारा देत स्वातंत्र्यांच्या निर्णायक लढ्याची सुरुवात केली होती. त्याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित कार्यक्रमात पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. 

प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दु. आ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नाना पटोले यांनी  (४ फेब्रुवारी) रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या नंतर (५ फेब्रुवारी रोजी) काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. त्यानुसार आता ते (ता. १२ फेब्रुवारी) रोजी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष व उपाध्यक्षही पदभार स्वीकारणार आहेत. 

काँग्रेस पक्षाला 2009 मध्ये राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नानांची बंडखोर नेता अशी प्रतिमा आहे. ते भाजपकडून एखदा आमदार व खासदार झाले. पक्षसंघटनेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा पक्षात प्रदेशाध्यक्षपद मिळवणारे नाना हे राज्यातील आतापर्यंतचे एकमेव नेते ठरले आहेत. इतर पक्षांतून आलेल्यांना एक वेळ मुख्यमंत्री, मंत्री करतील पण पक्षाचा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसमध्ये करणार नाही, हा समज पटोलेंच्या नियुक्तीने दूर झाला आहे.

पटोलेंना सहकार्य करण्यासाठी सहा कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद अरीफ नसीम खान, आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि आमदार प्रणीती शिंदे यांना कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहे.

याशिवाय उपाध्यक्ष म्हणून शिरीश चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, भा. ई. नगराळे, शरद आहेर, एम. एम. शेख आणि माणिक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

नवीन पार्लमेंटरी बोर्ड पुढीलप्रमाणे :

नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शरद रणपिसे, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, शिवराज पाटील, मुकुल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव, अविनाश पांडे, मिलिंद देवरा, विलास मुत्तेमवार, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, के. सी. पाडवी, विजय वडेट्टिवार, डाॅ. नितीन राऊत, वर्षा गायकवाड, सुनील केदार, अस्लम शेख, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, विश्वजीत कदम, सतेज पाटील, वसंत पुरके, सुरेश धानोरकर, रणजीत कांबळे, सुरेश शेट्टी, हुसेन दलवाई, अनंत गाडगीळ, बाबा सिद्दकी, अशिष देशमुख, भालचंद्र मुणगेकर, मुशरफ हुशेन, मोहन जोशी. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com