ओबीसींना राजकीय व्यवस्थेतून हद्दपार करण्याचा भाजपचा हा प्रयत्न..पटोलेंचा आरोप 

ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे.
4nana_4.jpg
4nana_4.jpg

मुंबई : "स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणूकीत ओबीसींचे OBC राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. ओबीसींना राजकीय व्यवस्थेतून हद्दपार करण्याचा भाजचा हा प्रयत्न आहे, हा प्रकार आम्ही सहन करणार नाही. या विरोधातील लढ्यात आम्ही सहभागी होऊ," असे कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. Nana Patole criticizes BJP OBC reservation 

नाना पटोले म्हणाले,  ''ज्यावेळी हे प्रकरण कोर्टात होते त्यावेळी कोर्टानं सांगितले होते, तुम्ही जनगणना करुन ही यादी जाहीर केली पाहिजे. नेमकी ओबीसींची संख्या किती आहे, हे कळवा, पण केंद्र सरकारने जाणीवपूर्वक ही जनगणना केली नाही, त्यामुळे १९३१ची जनगणना ग्राह्य धरुन सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला आहे. या माध्यमातून भाजपनं ओबीसींवर अन्याय केला आहे. हे या निकालावरुन स्पष्ट होते.'' 

''ओबीसींना राजकीय व्यवस्थेतून हद्दपार करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे, हा प्रकार आम्ही सहन करणार नाही. या लढा ओबीसी उभा करतील, या लढ्यात आम्ही सहभागी होऊ.''असे पटोले म्हणाले.  ''न्यायालयात सरकारने बाजू योग्य पद्धतीने मांडली नाही. यामुळे ओबीसी कार्यकर्त्यांचा राजकीय भविष्य  उद्धवस्थ करण्याचा हा निर्णय आहे,'' असे ओबीसींचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.  

क्षमता असणाऱ्या व्यक्तींनाच भेटा..तरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल.. राणेंनी दिला संभाजीराजेंना सल्ला...
  
मुंबई : सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलं आहे, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचे खासदार संभाजीराजे हे राज्यातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. . त्यांनी काल राष्ट्रवादी कॅांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आदींना भेटले.  भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी संभाजीराजेंना याबाबतचा सल्ला दि़ला आहे.  "संभाजीमहाराज, तुम्ही राजीनामा देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. तुम्ही भाजपमध्ये राहून तुम्ही मराठा आरक्षणाची मोहिम हातात घेतली आहे. त्यामुळे नक्कीच मराठा आरक्षण मिळणारच. राजीनामा न देता योग्य व्यक्तींना जर भेटलात ज्याच्यात आरक्षण देण्याची क्षमता आहे. तर हा प्रश्न सूटू शकतो. त्यामुळए राजीनामा देऊ नका, अशी माझी विनंती आहे," असे नारायण राणे यांनी सांगितले.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com