अण्णा हजारेंसारखे व्हायचे असेल तर सोमय्यांनी भाजपमधील भ्रष्टाचार बाहेर काढावा

सोमय्या यांना अण्णा हजारे सारखे व्हायचे असेल तर त्यांनी भाजप मधील भ्रष्टाचार बाहेर काढावा.
nana patole.jpg
nana patole.jpg

मुंबई : ''सत्तेचा दुरुपयोग करण्याच काम केंद्रातील भाजप सरकार जाणीवपूर्वक करत आहे. आज अनेक प्रश्न आहेत. पण गोरख धंदा भाजपचा सुरू आहे.. लोकाचा जीव घेण्याच काम भाजप करीत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच काम भाजपने सुरू केलं आहे,'' असा आरोप कॉग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. 


नाना पटोले Nana Patole म्हणाले की, भाजपचे नेते किरीट सोमय्या हे कुठल्याही पदावर नाही, तर त्यांना स्पेशल सिक्युरिटी का दिली जाते.  सोमय्या  Kirit Somaiya यांना अण्णा हजारे सारखे व्हायचे असेल तर त्यांनी भाजप मधील भ्रष्टाचार बाहेर काढावा. 

''ईडी, सीबीआयबाबत ते लिलाव केल्यासारखे बोलतात. भाजपवाले सत्तेचा दुरुपयोग करतात. केंद्रिय मंत्री नारायण राणे प्रकरणात काय झाले कशासाठी नोटीस दिली आहे,  हे तपासावे लागेल. भाजप मध्ये गेलेले लोक दुधाने स्वछ असतात, असे ते म्हणतात,''असे पटोले यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर कारवाई झाली, याबाबत ते म्हणाले, ''इतर मागासवर्गीय बद्दल भाजपला राग आहे. म्हणून भाजपने त्याच्यावर कारवाई केली. न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले.. पण भाजपची अत्याचारीत व्यवस्था या प्रकरणातून समोर आली,'' असे पटोले म्हणाले. 


स्थानिक नेत्यांच्या तक्रारीमुळे राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा राजीनामा
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील Abhishek Patil यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांना अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा पाठविला आहे. आपल्याला जळगाव महानगर अध्यक्ष पदावरून कार्यमुक्त करावे अशी त्यांनी पत्रात विनंती केली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com