सचिन वाझेंना मर्सिडिज घेण्यास नाना पटोले आणि सचिन सावंतांकडून मदत? - Nana Patole and Sachin Sawant help to get a Mercedes for Sachin Waze | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन वाझेंना मर्सिडिज घेण्यास नाना पटोले आणि सचिन सावंतांकडून मदत?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मार्च 2021

सचिन वाझे यांना मर्सिडिज घेण्यास  नाना पटोले आणि  सचिन सावंत यांनी मदत केली असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.

मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या चौकशीत अनेक आश्‍चर्यकारक गोष्टी पुढे येत आहेत. वाझेंकडून जप्त करण्यात आलेल्या मर्सिडिज मोटारीत पाच लाख रूपये रोख, काही कपडे व नोटा मोजण्याची मशीन सापडल्याची खळबळजनक माहिती तपास करणाऱ्या ‘एनआयए’चे मुंबई प्रभारी अनिल शुक्ला यांनी दिली. NIA ने ताब्यात घेतलेली मर्सिडिज गाडी कोणाची याबाबतही चर्चा सुरू आहे. या मर्सिडिज गाडीबाबत भाजपचे नेते आशिष शेलार यांची गंभीर आरोप केले आहेत. 

सचिन वाझे यांना मर्सिडिज घेण्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मदत केली असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. याबाबत चैाकशी व्हावी, अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.' नाना पटोले यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. पटोले हे सचिन वाझेंचे दलाल म्हणून काम करीत आहेत,' अशी टीका शेलार यांनी केली आहे.  

सचिन वाझे प्रकरणामध्ये रोजच नवनवीन खुलासे समोर येत आहेत, असाच एक धक्कादायक खुलासा एनआयए (NIA)  च्या तपासा दरम्यान समोर आला आहे. NIA ने ताब्यात घेतलेली मर्सडिज कार ही धुळ्यातील एका उद्योजकाची असल्याचं समोर आले आहे."

सचिन वाझे प्रकरणमधील मर्सिडीज गाडी माझीच होती, परंतु ती गाडी मी फेब्रुवारीमध्येच car24 या online कंपनीला विकली. त्यामुळे या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही," असं या गाडीचे आधीचे मालक उद्योजक सारांश भावसार यांनी सांगितलं आहे. "या प्रकरणी जर काही माहिती तपास यंत्रणेला पाहिजे तर मी निश्चित सहकार्य करेल," असे आश्वासन भावसार यांनी दिले आहे.

वाझेच्या मोटारीत सापडलेल्या कपड्यांमध्ये पीपीई किट असल्याबाबत स्पष्ट बोलण्यास ‘एनआयए’चे मुंबई प्रभारी अनिल शुक्ला यांनी नकार दिला आहे. मात्र, याबाबत तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मोटारीतून स्कॉर्पिओला वापरण्यात आलेल्या दोन नंबर प्लेट मिळाल्याचे शुक्ला यांनी सांगितले. ही मोटार स्वत: वाझे चालवत असल्याचे स्पष्ट झाले असून मोटारीचा मालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख