धक्कादायक ; तीन महिन्याच्या चिमुरडीला जिवंत पुरलं! - Mumbai three month old girl was buried alive Two arrested | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक ; तीन महिन्याच्या चिमुरडीला जिवंत पुरलं!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

एक साडी, एक नारळ, अकराशे रुपये न दिल्याने गरीब दांपत्याला आपल्या तीन महिन्याच्या चिमुरडीला गमवावं लागलं.

मुंबई : मानवतेचा काळीमा फासणारी घटना काल रात्री मुंबईत घडली. एका तृतीय पंथीयाला बक्षिस म्हणून एक साडी, एक नारळ, अकराशे रुपये न दिल्याने गरीब दांपत्याला आपल्या तीन महिन्याच्या चिमुरडीला गमवावं लागलं. आंबेडकरनगर येथे ही धक्कादायक घटना घडली.

मुलगी झाली म्हणून एक तृतीयपंथी बक्षिस मागण्यासाठी त्या मुलीच्या पालकांकडे काल रात्री साडेनऊ वाजता आला होता. एक साडी, एक नारळ आणि अकराशे रूपयांची मागणी त्याने पालकांकडून केली. पण हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्या पालकांना त्याची मागणी पूर्ण करता आली नाही. या घटनेचा राग धरुन तो तृतीयपंथी तेथून निघून गेला.  

बक्षिस न मिळाल्याने तो पुन्हा त्या मुलीच्या घरी रात्री सुमारे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास गेला. त्यांच्या सोबत त्याचा मित्र सोनू हा होता. त्या दोघांनी त्या तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहण केलं. त्यांनी तिला कफ परेड येथील आंबेडकर नगरच्या मागील खाडीत जिवंतच पुरलं. पोलिसांना याची माहिती मिळताच त्या दोघांचा  शोध सुरु केला. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.  

चारनंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी वसुलीचे नवे रेट कार्ड ; मनसेचा टोला
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. देशपांडे यांनी एक व्हिडिओ टि्वट करीत ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख