मुंबई स्थायी समिती बैठकीचा वाद उच्च न्यायालयात!

पालिकेच्या समितीने बुधवारी (ता. 16) नियोजित बैठकीचा मसुदा जाहीर केला. यामध्ये सुमारे 674 मुद्दे एकाच दिवशी एकाच बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.
मुंबई स्थायी समिती बैठकीचा वाद उच्च न्यायालयात!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीचा वाद उच्च न्यायालयात पोहचला आहे. समितीच्या बुधवारी (ता. 21) होणाऱ्या बैठकीत तब्बल 674 ठरावांवर दूरचित्रसंवादाद्वारे एकाच वेळी सुनावणी घेण्याच्या पालिकेच्या नियोजित मसुद्याला नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

त्यांच्या याचिकेवर मंगळवारी (ता. 20) सुनावणी होणार आहे.

पालिकेच्या समितीने बुधवारी (ता. 16) नियोजित बैठकीचा मसुदा जाहीर केला. यामध्ये सुमारे 674 मुद्दे एकाच दिवशी एकाच बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तातडीने या मुद्द्यांवर विनाचर्चा मंजुरी मिळावी, या हेतूने हा प्रस्ताव मांडला आहे. आभासी सुनावणीमध्ये एवढे प्रस्ताव कशासाठी आहेत? असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे.

 लॉकडाऊननंतर होणारी ही पहिलीच बैठक असणार आहे. मुंबई शहरासाठी महत्त्वाचे असणारे हे प्रश्न चर्चेविना संमत होता कामा नयेत. त्यामुळे प्रत्यक्ष बैठकीत यावर चर्चा व्हायला हवी, अशी मागणी केली आहे. मे महिन्यात ही समितीने बैठक आयोजित केली होती, त्यावेळी सुमारे 80 प्रस्ताव निर्धारित होते; मात्र संसर्गामुळे ती होऊ शकली नाही.

 तेदेखील अजूनही प्रलंबित आहेत. नुकताच 27 समित्यांसाठीच्या अध्यक्षपदाच्या नियुक्‍त्या प्रत्यक्ष घेण्यात आल्या होत्या; मग आताही तशाच प्रकारे बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे. याचिकेचा उल्लेख आज मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे करण्यात आला. न्यायालयाने मंगळवारी 

ऑनलाईन सुनावणी जाणीवपूर्वक
ऑनलाईन सुनावणीमध्ये प्रत्येक प्रश्नावर चर्चा करणे शक्‍य नाही, त्यामुळे जाणीवपूर्वक पालिकेच्या वतीने अशा प्रकारची बैठक ठेवण्यात आली आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. आतापर्यंत कोणत्याही कारकिर्दीत अशी बैठक आयोजित करण्यात आली नव्हती, असा दावाही याचिकेत केला आहे.
 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com