सत्ताधीशांचा वसूलीचा नाद खुळा.. पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा..शेलारांकडून व्हिडिओ व्हायरल.. - mumbai rains bjp mla ashish shelar slams shivsena over water logging mumbai city | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

सत्ताधीशांचा वसूलीचा नाद खुळा.. पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा..शेलारांकडून व्हिडिओ व्हायरल..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 जून 2021

आशिष शेलार यांनी टि्वट करुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई  : मुंबई आणि उपनगरात  पहिल्याच पावसात पाणी साचल्याने भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबईतील नालेसफाईच्या दाव्यावर टीका करीत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टि्वट करुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. mumbai rains bjp mla ashish shelar slams shivsena over water logging mumbai city

काल मध्यरात्रीपासून मुंबई, परिसरात पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनचालक व नागरिकांची तारांबळ होत आहे. रेल्वेरुळावर पाणी साचल्यामुळे मध्य व हार्बर रेल्वेची सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. याबाबतचा व्हिडिओ आशिष शेलार यांनी टि्वट केला आहे. 

"डेब्रीजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात...आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात! आता तरी मुंबईकरांची खरी काळजी करा," अशी कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिली आहे.

मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलेय.. घरात पाणी घुसू लागलेय..नालेसफाई कधी 107%..कधी 104%... दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने "वाझे" पहिल्या पावसातच "कटकमिशन"चे सगळे व्यवहार उघडे! मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा नेमेची येतो पावसाळा...पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा, असे शेलार यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. 

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ...चैाकशीचे आदेश 
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने त्यांच्या चैाकशीचे आदेश दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनारी बेकायदा जमिन खरेदीप्रकरणी अनिल परब यांची चैाकशी होणार आहे. समुद्र किनारपट्टीचे नियम न पाळता त्यांनी ही जमिन खरेदी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.   भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, गिरीश बापट आणि मनोज कोटक यांनी याबाबतची तक्रार केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली होती. त्यानंतर मंत्रालयाने परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख