मुंबईत ठाण मांडून बसलेल्या ७२७ पोलिस अधिकाऱ्यांना दिलासा

सहा महिन्यानंतर कारवाई करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.
0Police_20Corrected_2.jpg
0Police_20Corrected_2.jpg

मुंबई : आठ वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत पोलिस अधिका-यांच्या आंतरजिल्हा बदली थांबवली. मुंबईतील 727 अधिका-यांची यादी तयार करण्यात आली होती. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात पोलिस खात्याचे बदनामी झाल्यानतंर आता आठ वर्षांहून अधिक कालावधी मुंबई शहरात काढणा-या पोलिसांची आंतरजिल्हा बदली करण्यात येणार होती. Mumbai Police officers who completed 8 years transfer orders to stay for 6 months

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींची वसुली करण्याचे कथित आदेश दिल्याच्या प्रकरणात सचिन वाझेसह अनेक पोलिस अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहेत. पोलिस अधिकाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचार आणि तत्सम गंभीर आरोप लक्षात घेत पोलीस विभागाने मोठा निर्णय घेतला होता. 

मात्र, शहरात पोलिस दलात असलेली रिक्त पदे, कोविड -१९ चा प्रादुर्भाव, सण, पालिका निवडणुका, गणपती, नवरात्र या पार्श्वभूमीवर काल झालेल्या पोलिस आस्थापन मंडळाच्या बैठकीत या आदेशावर सहा महिन्यानंतर कारवाई करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.
 
शहरामध्ये आठ वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांची मुंबईबाहेर बदली होती. त्यात नवी मुंबई, ठाणे आणि पुणे सारख्या शहरांचा समावेश होता.

  IAS अधिकारी चांदणी चंद्रन यांनी सांगितली "एका लग्नाची गोष्ट" 
नवी दिल्ली  : महिला आयएएस IAS अधिकारी चांदणी चंद्रन यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतानाचा एक फोटो टि्वटर शेअर केला आहे. या फोटोची सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगली आहे. चांदणी या २०१७च्या बॅचच्या आयएएस IAS अधिकारी आहेत. सध्या त्या त्रिपुरा येथील कंचनपूर येथे उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहेत. हा फोटो शेअर करीत असताना त्यांनी  IAS बनण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला याची माहिती दिली आहे. या एका फोटोमुळे त्यांचे आयुष्य कसे बदलले यांची रंजक माहिती त्यांनी शेअर केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com