गुंड रवी पुजारीचा ताबा पुन्हा बंगळुरु पोलिसांकडे..

पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना धमकावल्याचे सांगण्यात येते.
1pujari10.jpg
1pujari10.jpg

मुंबई :  कुख्यात गुंड रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांनी पून्हा बंगळुरु पोलिसांकडे  सोपविला आहे.  मुंबई पोलिसांनी 10 गुन्ह्यात त्याची चौकशी केली असून त्यापैकी एका गुन्ह्यात आरोपपञ न्यायालयात दाखल केले आहे.Mumbai Police investigate ravi pujari in nine cases request to africa court 

अफ्रिकेतील  सेनेगल येथून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या रवी पुजारी याच्या विरोधात मुंबईत 49 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 26 गुन्हे "मोक्का' अंतर्गत आहेत. 2017-18 मध्ये अनेकांनी त्याच्याकडून धमकीचे फोन येत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या.  2009 ते 2013 दरम्यान पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना धमकावल्याचे सांगण्यात येते. 

या दहा गुन्ह्यांचा व्यतिरिक्त अन्य 9 गुन्ह्यात त्याचा ताबा पून्हा मिळावा, यासाठी मुंबई पोलिसांनी पून्हा अफ्रिकेतील सेनेगल कोर्ट आणि बंगळुरु तपास यंञणेकडे विनंती केली आहे. या 9 गुन्ह्यात बॅालिवुडमधील कलाकारांना दिलेल्या धमकींच्या गुन्ह्याचा समावेश असल्याची माहिती सूञांनी दिली आहे. पुजारी विरोधात बंगळूरुत 39, मंगलोरमध्ये 36, उडुपीत 11, म्हैसूर -हुबळी-धारवाड-कोलार-शिवमोगा येथे प्रत्येकी एक गुन्हा पुजारीच्या विरोधात दाखल आहे. त्याच्या विरोधात गुजरातमध्येही सुमारे 75 गुन्हे दाखल आहेत.

PNB गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोकसीला अटक..
 
 नवी दिल्ली  : पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी व  हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोकसी  mehul choksi हा एंटीगुआ येथून बेपत्ता झाला होता. त्याला डॅामिनिका देशातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेबाबत इंटरपोलने सीबीआयला कळविलं आहे. अँटिगुआ येथून अचानक गायब झालेला फरार भारतीय उद्योजक मेहुल चोकसी शेजारच्या डॅमिनिकामध्ये सापडला आहे. जिथून त्याला पुन्हा एंटीगुआ  येथे आणण्याची तयारी सुरू आहे. त्याला डॅमिनिकच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. मेहुल चोकसी हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे, त्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. तीन दिवसापासून मेहुल चोकसी हा बेपत्ता होता. याबाबत चोकसीचे वकील विजय अग्रवाल यांनी.'एनआयआय' माहिती दिली होती.  विजय अग्रवाल म्हणाले की मेहुल चोकशी बेपत्ता झाल्याने त्यांचा परिवार चिंतेत आहे. मला याबाबत चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आले आहे. एंटीगुआचे पोलिस मेहुल चोकसी यांचा शोध घेत होते. त्यांच्या सुरक्षिततेबाबत त्यांचे कुंटुबिय चिंतेत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले होते.  
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com