सांगून कळत नसेल  तर व्यवस्थित समजावलं जाईल; पोलिस आयुक्त नगराळे यांचा इशारा

निर्बंध कठोर करण्यासंदर्भात मुख्यमंञ्यांचे आदेश आलेले आहेत.
Mumbai police commissioner appeal public to follow restriction
Mumbai police commissioner appeal public to follow restriction

मुंबई : निर्बंध कठोर करण्यासंदर्भात मुख्यमंञ्यांचे आदेश आलेले आहेत. त्यानुसार स्थानिक पातळीवर  सूचना केल्या आहेत.गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोब्सत वाढवला आहे. मास्क न लावणाऱ्यावर कारवाई वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यमुळे नागरिकांना जबाबदारी घेऊन वागावे. माञ, अनेक जण नियम पाळत नाहीत. त्यामुळे ज्यांना सांगून कळत नसेल त्यांना व्यवस्थित समजावलं जाईल, असे सांगत मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नागरिकांना कडक कारवाईचा इशारा दिला.

हेमंत नगराळे यांनी आज पत्रकार परिषदेत कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मागील वर्षीच्या लॅाकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवाही बंद होत्या. पण आता बहुतेक अत्यावश्यक सेवा सुरू आहे. त्यामुळे हा लॅाकडाऊन वेगळा आहे. कोरोनाचा दुसरी लाट खूपच भयंकर आहे. शासनावर अवलंबून न राहता नागरिकांनीही काळजी घ्यावी. शासन प्रयत्न करतच आहे.  

पोलिस ठाणे अंतर्गत परिसरात मान्यवर, सामाजिक सेवक यांच्यासोबत बैठका घेऊन हे पालन करण्याचं आवाहन केले जात आहे. पोलिस त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. पण ८ हजाराहून अधिक पोलिस कर्मचारी संक्रमित झाले होते. आता ती संख्या ५०० वर आहे. तर या आजाराने १०२ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पोलिस रस्त्यावर आहेत ते जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे संख्याबळ कमी आहे. तरीही १२ तास पोलिस काम करून आपली जबाबदारी संभाळत आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलीसांना मदत करावी, असे आवाहन नगराळे यांनी केले.

पोलिसांनाही सबुरीने वागण्याचे आदेश दिले आहेत. माञ कृप़या पोलिसांना कठोर नियम घ्यायला लावू नका. चांगले सांगून कुणाला कळत नसेल  तर त्यांना व्यवस्थित समजवलं जाईल. पोलिस हे जनतेच्या रक्षणासाठी आहेत. नागरिकांचे दोन चांगले शब्द त्या अधिकाऱ्याला उत्साह देऊन जातात. ही सामाजिक बांधिलकीची जाणीव पोलिस आणि जनतेमध़्ये होते, असे नगराळे यांनी नमुद केले. 

गावी जाणाऱ्या गाड्यांसाठी होणारी गर्दी लक्षात घेता, लोकल प्रशासनासाठी बोलून वाढीव गाड्या सोडून त्यांना शिस्तबद्ध पद्धतीने पाठवण्याबाबत बोलणं सुरू आहे. त्यांना पोलीसांची मदत गरजेनुसार देत आहोत. सोशल मिडियावर अफवा पसरवणे चुकीचे आहेत. त्यामुळे आलेले मेसेज पुढे पाठवताना नागरिकांनी खबरदारी  घ्यावी, असे आवाहन नगराळे यांनी केले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com