मुंबई, नवी मुंबई विमानतळांचे मुख्यालय मुंबईतच राहणार: अदानींचे स्पष्टीकरण - Mumbai, Navi Mumbai Airports will be headquartered in Mumbai-arj90 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मुंबई, नवी मुंबई विमानतळांचे मुख्यालय मुंबईतच राहणार: अदानींचे स्पष्टीकरण

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 जुलै 2021

अदानीने या दोनही विमानतळांच्या व्यवस्थापनांचा ताबा नुकताच मिळवला आहे.

मुंबई : मुंबई (Mumbai) तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांचे (Airports) मुख्यालय मुंबईतच राहणार असल्याचा निःसंदिग्ध खुलासा अदानी समूहाकडून मंगळवारी (ता. २० जुलै) करण्यात आला. यासंदर्भात पसरलेल्या अफवांचे अदानीकडून खंडन करण्यात आले. (Mumbai, Navi Mumbai Airports will be headquartered in Mumbai) 

देशातील अदानीच्या ताब्यातील विमानतळांचे संचालन करणाऱ्या 'अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड.' या कंपनीचे मुख्यालय मात्र अहमदाबादला नेले जाणार असल्याचेही कंपनीने दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे. त्याचमुळे या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर अदानी समुहावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. 

हेही वाचा : गणेश नाईकांची एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दमबाजी

यासंदर्भात विविध प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या चुकीच्या बातम्या आणि त्यामुळे पसरलेल्या अफवा यामुळे अदानीतर्फे संध्याकाळी ट्विट करून हे स्पष्टीकरण देण्यात आले. अदानीने या दोनही विमानतळांच्या व्यवस्थापनांचा ताबा नुकताच मिळवला आहे. या विमानतळांमार्फत सर्वांना अभिमान वाटेल, असे मुंबई शहर घडवण्याचा तसेच हजारो रोजगार निर्माण करण्याचा आमचा निर्धार कायम आहे, असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे. या दोनही विमानतळांचे मुख्यालय यापुढेही मुंबईतच राहील; मात्र अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि. चे मुख्यालय अहमदाबादला नेण्याचा निर्णय कायम आहे, असेही अदानीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

हेही वाचा : फडणवीसांची कबुली; निवडणूक निकालानंतर अधिकारी इस्त्राईलला गेले पण...

दरम्यान, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी समूहाने जीव्हीके ग्रुपकडून घेतला आहे. अदानी समूहाकडे गुवाहटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरु, जयपूर व तिरुवंतपुरम येथील विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा आहे. जयपूर, तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षरी केली होती. 

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख