BMC निवडणूक : भाजपला रोखण्यासाठी महापालिकेतही महाविकास आघाडीची नांदी..  - Mumbai Municipal Corporation election Unity of Mahavikas Aghadi parties  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

BMC निवडणूक : भाजपला रोखण्यासाठी महापालिकेतही महाविकास आघाडीची नांदी.. 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 एप्रिल 2021

भाजपला रोखण्यासाठी आगामी काळात महापालिकेतही महाविकास आघाडीतल्या पक्षांची एकजूट पाहायला मिळणार का, हे लवकरच समजेल.

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या आधी होणा-या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाकडून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि समाजवादी पक्षाने अर्ज दाखल केले नाहीत. 

कॅाग्रेसकडून समिती निवडणुकांसाठी अर्ज दाखल झाले असले तरी कॅाग्रेस अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा आहे. कॅाग्रेसही शिवसेनेलाच पाठिंबा देणार असल्याचा सेनेकडून दावा करण्यात आला आहे. भाजपला रोखण्यासाठी आगामी काळात महापालिकेतही महाविकास आघाडीतल्या पक्षांची एकजूट पाहायला मिळणार का, हे लवकरच समजेल.

 
शिवसेनेकडून यशवंत जाधव, संध्या दोषी, सदा परब यांना संधी...  
शिवसेनेकडून वैधानिक समिती निवडणूकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले.  महत्वाच्या समित्यांवर सेनेकडून यंदा आधीच्या अध्यक्षांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेकडून भाजपला रोखण्यासाठी जूनी फळीच मैदानात उतरविण्यात आली आहे. यशवंत जाधव यांचा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. संध्या दोषी यांचा शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी, सदा परब यांचा सुधार समिती, बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी आशिष चेंबुरकरांना संधी देण्यात आली आहे. 

भाजपाकडून शिरवाडकर, यादव, म्हात्रे, गंगाधरे यांना उमेदवारी
मुंबई पालिकेतील स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज, गुरुवारी होत आहे. या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून राजेश्री शिरवाडकर (स्थायी समिती), पंकज यादव (शिक्षण समिती), स्वप्ना म्हात्रे (सुधार समिती), प्रकाश गंगाधरे (बेस्ट) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख