भाजपच्या हक्काच्या मतदारांमध्ये खिंडार पाडण्यात काँग्रेस यशस्वी होणार का?

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा स्वबळाचा नारा शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.
3download_20_281_29_85.jpg
3download_20_281_29_85.jpg

मुंबई : मुंबई Mumbai Municipal Corporation महापालिकेच्या 227 जागासाठीची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली असताना राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांत वातावरण तापू लागले आहे. राज्यात या सध्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे.

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनाShiv Sena ,राष्ट्रवादी आणी काँग्रेस  Congress या तीन पक्षांनी विरोधी पक्ष भाजपला शह देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीने लढण्याचा विचार प्राथमिक स्तरावर केला होता. याला शिवसेना आणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीरपणे पाठींबा दर्शवला होता. काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाखाली स्वबळाचा नारा देण्यात आला होता. त्यानंतर मात्र या तीन पक्षांनी स्थनिक पातळीवर निर्णय घेतला जाईल,असे जाहीर करून स्वतंत्र लढण्याचे निश्चित केले.यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेत काँग्रेस -शिवसेना एकत्र येणार नाहीत. हे जवळपास निश्चित झाले आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा स्वबळाचा नारा शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसची ही रणनिती भाजपच्या हक्काच्या मतदारांत खिंडार पाडण्यात यशस्वी होणार का? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहेत. मुंबई महापालिकेच्या 227 जागासाठीची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली असताना राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांत वातावरण तापू लागले आहे. राज्यात या सध्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे.

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना,राष्ट्रवादी आणी काँग्रेस या तीन पक्षांनी विरोधी पक्ष भाजपला शह देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीने लढण्याचा विचार प्राथमिक स्तरावर केला होता. याला शिवसेना आणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीरपणे पाठींबा दर्शवला होता. काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाखाली स्वबळाचा नारा देण्यात आला होता. त्यानंतर मात्र या तीन पक्षांनी स्थनिक पातळीवर निर्णय घेतला जाईल,असे जाहीर करून स्वतंत्र लढण्याचे निश्चित केले.यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेत काँग्रेस -शिवसेना एकत्र येणार नाहीत. हे जवळपास निश्चित झाले आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेना सत्ता राखण्यासाठी यावेळी अटोकाट प्रयत्न करणार असली तरी भाजपने मिशन 114 चे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. भाजपची सारी भिस्त गुजराती, उत्तर भारतीय आणि बिहारी मतदारांवर आहे. तर काँग्रेसचा देखील गुजराती वगळता ऐकेकाळी तोच हक्काचा मतदार होता. मात्र, मागील निवडणुकांपासून तो भाजपकडे वळाल्यामुळे काँग्रेस कमी पडली तर भाजपची मते वाढली. याचा फटका मागील निवडणुकीत शिवसेनेला बसला होता. परिणामी शिवसेनेला सत्ता राखताना घाम गाळावा लागला होता.

महापालिका निवडणुकीत काँग्रेस -शिवसेना एकत्र लढले तर भाजपवर नाराज झालेला या मतदारासमोर पर्याय न उरल्यामुळे तो नाईलाजाने परत भाजप हाच पर्याय निवडेल. मात्र, काँग्रेस स्वतंत्रपणे लढला आणी या मतदारांना काही प्रमाणात पुन्हा खेचू शकला तर सेनेला त्याचा निश्चित लाभ होऊ शकतो,अशी शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत. हे शिवसेनेच्या पथ्यावरच पडणार आहे. हक्काच्या मतदारांत खिंडार पाडण्यात काँग्रेस यशस्वी होणार का? हे लवकरच समजेल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com