मुंबई पालिका आयुक्त म्हणतात 'मीच गळक्‍या बंगल्यात राहतो; म्हणून हा खर्च'

कोरोना विषाणूच्या साथीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मुंबई महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना आयुक्तांच्या बंगल्याची डागडुजी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी किमान 40 लाख रुपयांपर्यंत खर्च होणार आहे. यासाठी महापालिकेने निविदाही मागवल्या आहेत. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वीच या बंगल्याच्या डागडुजीसाठी 50 लाख रुपये खर्च करण्यात आले होते.
Mumbai Municipal Commissioner says, 'I live in a leaky bungalow; So this cost '
Mumbai Municipal Commissioner says, 'I live in a leaky bungalow; So this cost '

मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मुंबई महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना आयुक्तांच्या बंगल्याची डागडुजी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी किमान 40 लाख रुपयांपर्यंत खर्च होणार आहे. यासाठी महापालिकेने निविदाही मागवल्या आहेत. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वीच या बंगल्याच्या डागडुजीसाठी 50 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. 

लॉकडाउनमुळे मुंबई महापालिकेचे उत्पन्न जुलै महिन्यापर्यंत 4 हजार कोटी रुपयांनी घटले आहे. अशातच चार वर्षांपूर्वी दुरुस्ती झालेल्या बंगल्यासाठी पुन्हा 40 लाखापर्यंतचा खर्च करण्यात येणार आहे. सन 2016 मध्ये महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 50 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. सध्याची दुरुस्ती तातडीची असून काही ठिकाणी छतातून पाणी गळत असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, चार वर्षांपूर्वी झालेल्या दुरुस्तीत रुफ शिट बदलण्यात आली होती. त्यानंतरही छत गळत असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. 

उत्पन्न घटल्यामुळे महापालिकेने कॉस्ट कटिंगचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विभागाचा किमान 10 ते 15 टक्के खर्च कमी होणार आहे. अशा परीस्थितीत चार वर्षांपूर्वी दुरुस्ती झालेल्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी पुन्हा 40 लाख रुपये खर्च करण्यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्‍यता आहे. 
 

नऊ वर्षांत 92 लाख खर्च 

ताडदेवजवळील एम. एल. डहाणूकर मार्गावरील (कारमायल रोड) 1930 मध्ये बांधलेला हा बंगला हेरिटेज श्रेणीतील आहे. सन 2011 पासून या बंगल्याच्या डागडुजीसाठी आतापर्यंत 92 लाख रुपये खर्च झाले आहेत. सन 2015 मध्ये झालेल्या कामात डागडुजीबरोबर बंगल्यांची रंगरंगोटी करण्यात आली होती. तसेच, फायबर ग्लासचे छतही बसवण्यात आले होते. त्यासाठी 29 लाख 54 हजार रुपये खर्च करण्यात आला होता; तर 2011 मध्ये 24 लाख 10 हजार, त्यानंतर 2012 मध्ये 39 लाख 29 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. 

निवासस्थान काही ठिकाणी जीर्ण झाले आहे. काही ठिकाणी पडझडही झाली असून धोकादायक स्थितीत आहे. छतावर प्लास्टिकची ताडपत्री टाकण्यात आली आहे; तरीही खोल्यांमध्ये पाणी गळत आहे. प्रत्यक्ष निवास स्थानाची पाहणी करून कोणीही याची खात्री करू शकतो. त्यानंतर दुरुस्ती करावी की नाही, हेदेखील तो सांगू शकते. 

- इक्‍बालसिंह चहल, मुंबई महापालिका आयुक्त 


Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com