केंद्रातून मदत आणतो म्हणणाऱ्या आठवलेंना मुख्यमंत्र्यांनी काढला चिमटा...

मेट्रोचे काम अतीशय देखणे आहे. जर आपण सहज तिकडे बघितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. मेट्रोचे कोच देशामध्ये बनले आहेत.
  Uddhav Thackeray .jpg
Uddhav Thackeray .jpg

मुंबई : मेट्रोच्या कार्यक्रमाला येताना मला मुंबईत वाहतूक कोंडी दिसली. ही चिंता करणारी गोष्ट आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही. सगळे असे वागायला लागले तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईकरांना दिला. (Mumbai Metro route inaugurated by Chief Minister Uddhav Thackeray) 

मुंबईतील (Mumbai Metro) टर्मिनल १ व टर्मिनल २ येथील नियंत्रित प्रवेश मार्ग प्रकल्पाचे भुमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. तसेच, मुंबईला अधिक वेगवान बनवणाऱ्या मेट्रो 2A व मेट्रो 7 चाचणीला आजपासून सुरूवात झाली. कांदिवलीमधील आकुर्ली स्टेशनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी केंद्रीयमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मल्टीप्लीस्टिज पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

हा विकासाला वेग देणारा हा कार्यक्रम आहे. गेल्या वर्षभरही कार्यक्रम झाले, पण कोविड सेंटर उघडा, चाचणी केंद्राचे उद्घाटन करा, ऑक्सिजन प्लांट उघडा आदी कार्यक्रमच केली जात होते. आयुष्य ठप्प झालेले असताना कामाचा वेग मंदावला असेल पण तुम्ही काम थांबवू दिले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या कामाचे कौतुक केले. निर्बंध उठतील तेव्हा उठतील पण पूर्वीपेक्षा अधिक जोमाने काम करण्यासाठी आणि आयुष्य गतीमान करण्यासाठी ही कामे होत आहेत असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मला इथे आल्यानंतर १९६६ मधील मुंबई आठवली, तेव्हाच्या आणि आजच्या मुंबईत जमीन आसमानचा फरक पडला आहे. मुंबई शहर वाढत चालले आहे. चटई क्षेत्र म्हणजे काय हे मला नंतर कळले. रस्त्यावर रस्ते, भूयारी रस्ते हे आपण करतो आहे. विकास आणि वेग आपण कायम राखतो आहे. काही महिन्यांनी मेट्रोचे काम चालू होईल. मुंबईच्या मेट्रोच्या कार्यक्रमात सहभागी होता आले त्याचा अभिमान आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, मेट्रोचे काम अतीशय देखणे आहे. जर आपण सहज तिकडे बघितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. मेट्रोचे कोच देशामध्ये बनले आहेत. खुप चांगले काम सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मेट्रोचे असे कोच दिल्लीत असतील पण तिकडे नियमीत जाण्याचा योग आला नाही. मेट्रोच्या मल्टीप्लीस्टिज पुस्तक प्रकाशनावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की ''नव्या विचारांना आपण पुस्तकात नाहीत तर प्रत्यक्षात आणत आहात हे महत्त्वाचे. मुंबईमध्ये सुद्धा किल्ले आहेत. गुफा, शिलालेख आहेत. मुंबईला आधुनिकतेच्या सोबतच प्राचीणतेचीही ओळख आहे. आपली संत परंपरा आणि राजकीय वारसा हा मोठा आहे.

या कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी 'काही कमी पडले तर केंद्रातून मदत आणतो,' असे आश्वासन दिले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले मला 'आठवले' की मी नक्कीच तुम्हाला सांगतो, तसेही ते माझ्या शेजारचे आहेत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आठवले यांना चिमटा काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com