मोठी बातमी : सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबाबत गुरुवार पर्यंत निर्णय 

लस घेतल्यांना जर घरात बसावे लागत असेल तर लसीकरणाचा उपयोग काय?
Mumbai local .jpg
Mumbai local .jpg

मुंबई : लसीकरण झालेल्यां नागरिकांना लोकलने प्रवास (Mumbai local) करण्याची मुभा का देत नाही. लशीचे (Vaccination) दोन्ही डोस ज्यांनी घेतले आहे त्यांना घरी बसायला लावू शकत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. उच्च न्यायालयात वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही सूचना केली. या प्रकरणी गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. यावेळी सर्वसामान्यांना प्रवास देण्यासंबंधी गुरुवार पर्यंत भूमिका स्पष्ट करू, असे महाधिवक्त्यांनी न्यायालयात सांगितले. (Mumbai local travel decision till Thursday) 

वकिलांच्या संघटनेकडून ही याचिका करण्यात आली आहे. न्यायालयाने प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे आणि वकिलांना न्यायालयात वेळेत पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या मागणीवर मुख्यमंत्र्यांकडून अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी सरकारने दिली. सरकारने कोणत्या वकिलांना मुभा देता येईल या विषयीची माहीत दिली. वकिलांचाही फ्रंट लाईन वर्करमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

वकील आणि न्यायालयातील क्लार्कना लोकल प्रवासाची मुभा. या साठी वकिलांना आणि क्लार्कना लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र संघटनेकडे देणे अनिवार्य असेल. त्यानंतर संघटना वकीलांना मंजुरीसाठी प्रमाणपत्र देणार. हे प्रमाणपत्र दाखवून तिकीट विंडोवर केवळ पास दिला जाईल, दैनंदीन तिकीट मिळणार नाही, असे महाधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले.

यावेळी न्यायालयाने सर्वसामान्य जनतेचे काय?, असा सवाल केला. लस घेतल्यांना जर घरात बसावे लागत असेल तर लसीकरणाचा उपयोग काय? लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा सरकारचा मानस आहे, असे महाधिवक्तात्यांनी न्यायालयात सांगितले. त्यावर गुरुवारपर्यंत भूमिका स्पष्ट करुन, असे न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.    


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com