गुन्हे शाखेत मोठे फेरबदल.. सचिन वाझे प्रकरणानंतर 65 अधिकाऱ्यांची बदली.. .

गुन्हे शाखेतील 65 पोलिस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
mumbai24.jpg
mumbai24.jpg

मुंबई : अंबानी स्फोटक प्रकरणात गुन्हे शाखेच्या सचिन वाझे यांचा सहभाग उघड झाल्यानंतर गुन्हे शाखेतील 65 पोलिस अधिकाऱ्यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली.  अब्दुल करीम तेलगी प्रकरणानंतर मुंबई पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस दलात नाराजीचा सूर आहे. या अधिकाऱ्यांमध्ये काही कर्तबगार अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पोलिस दलातील स्वच्छता मोहिमेचा हा भाग असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. लवकरच आणखी काही अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्‍यता आहे.

निलंबीत पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षाने पोलिस दलात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामध्ये पोलिसांना पैशांचे "टार्गेट' देण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्यातच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग याच्या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता नवनिर्वाचित पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी 86 पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली, त्यात गुन्हे शाखेच्या 65 पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. अनेक अधिकारी कित्येक वर्षांपासून गुन्हे शाखेत कार्यरत आहेत; तर काही अधिकाऱ्यांची नुकतीच बदली झाली होती. त्यांनाही या नव्या आदेशानुसार पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. पोलिस दलातील स्वच्छता मोहिमेचा हा भाग असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. लवकरच आणखी काही अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्‍यता आहे.
 
बदल्यांमध्ये सीआययूमध्ये वाझेसोबत कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझी व प्रकाश होवाळ यांचाही समावेश आहे. याशिवाय गुन्हे शाखेत कार्यरत अजित दत्ताराम जाधव, उदय मनोहर राणे, नितीन प्रभाकर दळवी, चिमाजी जगन्नाथ आढाव, संजय भिकाजी निकम, अजय खाशाबा सावंत, विनय बाबूराव घोरपडे, विनायक भागोजी मेर, सचिन मुरारी कदम, अनिल ज्ञानदेव वाढवणे, सुनील दत्ताराम जाधव, चंद्रकांत नारायण दळवी, संदेश सदाशिव रेवाळे, निनाद मधुकर सावंत, केदारी कृष्णा पवार, संजीव दशरथ गावडे, सागर जगन्नाथ शिवलकर, नंदकुमार मारुती गोपाळे, धीरज विश्‍वनाथ कोळी, रईस मोहम्मद नजीर, सुधाकर दत्तू देशमुख, प्रभा सखाराम राऊळ, जगदीश साईल, हर्षवर्धन यशवंतराव गुंड, सतीश विठ्ठल तावरे, आशा विश्‍वनाथ कोरके, प्रवीण लक्ष्मण कदम, दत्तात्रय नामदेव मसवेकर, राजू देवबा अलदर, नितीन दिनकर उत्तेकर, रघुनाथ रामचंद्र निंबाळकर, प्रियंका सुरेश म्हात्रे, राजू संपत सुर्वे, सुनील बळवंत माने, उमेश पुरुषोत्तम सावंत, योगेश राजकुमार खानुरे, विश्‍वास आनंदा पाटील, विनोद विठ्ठल मालचे, अनंत भीमसेन शिंदे, प्रकाश चंद्रकांत सावंत, प्रशांत दिलीप मोरे, अतुल शांताराम आव्हाड, कीर्ती जालिंदर माने, संजय सीमाराम तोंडवळकर, सुनील आनंदा गाडे, सुरेश नामदेव पाटील, दगडू संपत काळे, सनील संभाजी देसाई, प्रकाश सदाशिव घाग, देवेंद्र जससिंग राणे, राजू शामराव बनसोडे, मुरलीधर संभाजी सावंत, सुधीर शिवराम कोरगावकर, तानाजी पाटील, संजय गिरकर, शरद घोसाळकर, प्रदीप आंबोळकर, संजय सुर्वे, सतीश खोत, खंडेराव बोबडे, शिवाजी भोसले, राम बागम, भीमराव यादव या गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.  

Edited  by :  Mangesh Mahale


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com